व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sujay Vikhe Patil : हे जेवण आहे, प्रसाद नाही, शिर्डीत पुन्हा संतापाची...

Sujay Vikhe Patil : हे जेवण आहे, प्रसाद नाही, शिर्डीत पुन्हा संतापाची लाट

Sujay Vikhe Patals new controversial statement on Sai Babas Prasad : सुजय विखे- पाटलांचे साईबाबांच्या प्रसादावर नवे वादग्रस्त वक्तव्य

Shirdi: भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिरातील प्रसादाबाबत पुन्हा वादग्रस्त विधान करत राजकीय आणि सामाजिक वातावरणात खळबळ माजवली आहे. पालिका प्रचार सभेत भाषण करताना त्यांनी साईबाबांच्या प्रसादाबाबत थेट प्रश्न उपस्थित केला असून, “लापशी आणि घुगऱ्या हा प्रसाद असतो, पण पोळी, भात, वरण, मिठाई हा प्रसाद नाही हे जेवण आहे” असे वक्तव्य करत त्यांनी पुन्हा वाद निर्माण केला आहे. यापूर्वीही त्यांनी साईभक्तांवर टीका करत, “रात्री दारू पिऊन जेवतात आणि सकाळी भक्त म्हणून फिरतात,” असे विधान केले होते. त्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता, परंतु आता त्यांच्या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रचारसभेत बोलताना सुजय विखे म्हणाले की, शिर्डीमध्ये एमआयडीसी आल्यानंतर रोजगार निर्मिती होणार असून स्थानिक व्यवसायांना चालना मिळणार आहे. मात्र प्रसादालयामुळे हॉटेल व्यवसायांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, “हॉटेल व्यवसाय चालावा म्हणून नव्हे, परंतु चुकीची पद्धत थांबावी म्हणून मी आवाज उठवणारच. लोक म्हणतात हा प्रसाद आहे, पण प्रसाद म्हणजे काय? प्रसाद घुगऱ्या आणि लापशी असते. आता जे दिलं जातं ते जेवण आहे. साईभक्तांना प्रसाद घ्यायला येण्यात हरकत नाही, पण रात्री दारू पिऊन काही लोक प्रसादालयात जेवायला येतात. सगळे साईभक्त नव्हते — भिकारी आणि गुन्हेगार होते. जेवायचं, झोपायचं आणि सकाळी दांडगी फिरायची. हे बंद झालं पाहिजे.”

Nilesh Rane Vs BJP : “गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही

त्यांनी पुढे असा दावा केला की, त्यांच्यावर टीका झाली तरी शिर्डी त्यांच्याच पाठीशी उभी आहे. “मी सुरुवातीला आवाज उठवल्यावर मला विरोध झाला. पण दुहेरी हत्याकांड झाले तेव्हा लोक म्हणाले — सुजय विखे खरं बोलत होते,” असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेला समर्थन मिळत असल्याचा दावा केला. काही काळापूर्वी सुजय विखे यांनी साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करून त्या निधीचा उपयोग मुलांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी करावा, अशी मागणी केली होती. परंतु यामध्ये ‘राज्यातील सगळे भिकारी मोफत जेवण्यासाठी शिर्डीत जमा होतात’ या वक्तव्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोधकांचा संताप ओढवून घेतला होता.

Palghar Land Scam : सात कोटींच्या बाजारमूल्याच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री

त्यांच्या ताज्या विधानानंतर पुन्हा एकदा शिर्डीत धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांसह राजकीय तापमान वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, सुजय विखेंच्या वक्तव्यावर संस्थान आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!