Voting in some municipal councils of West Vidarbha on December 20 : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही
Akola पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर, वाशिम जिल्ह्यातील वाशिम नगरपालिका, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, तसेच अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी या नगरपालिकांमध्ये आता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. बाद झालेल्या काही उमेदवारांना न्यायालयीन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने, राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या.
आयोगाने स्पष्ट केले की, अपील प्रलंबित असलेल्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल उशिरा आला, त्या नगरपालिकांचे मतदान पुढे ढकलण्यात आले असून, २० डिसेंबर हा नवीन मतदानाचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
Municipal election 2025 : सत्ताधाऱ्यांचा यावर अभिमान वाटत असेल तर लोकशाहीचं नुकसान !
मूळ कार्यक्रमानुसार २ डिसेंबरला होणारी संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली होती. अपीलात विजय मिळवलेल्या उमेदवारांना माघारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने सांगितले. संबंधित उमेदवारांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करताना न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय रद्द केला व तिघांचीही उमेदवारी कायम ठेवली. मात्र, निकाल लागल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी चिन्हवाटपाची तारीख होती, ज्यामुळे उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी वेळ मिळू शकला नाही.
राज्यातील इतर काही नगरपालिकांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने निवडणूक आयोगाने राज्यभरासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी स्थगितीनंतरचा पुढील कार्यक्रम जाहीर करतील.
Nagar Parishad Election Result : उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा आदेश
नवीन कार्यक्रमानुसार —
१० डिसेंबर, दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारीसाठी मुभा
११ डिसेंबर : अंतिम यादी व आवश्यकतेनुसार चिन्हवाटप
२० डिसेंबर : मतदान
२१ डिसेंबर : मतमोजणी
यानुसार, नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठीची निवडणूक आता २० डिसेंबरपर्यंत स्थगित झाली आहे.








