व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Balwant Wankhede : अमरावती स्टेशन स्थलांतराचा मुद्दा संसदेत!

Balwant Wankhede : अमरावती स्टेशन स्थलांतराचा मुद्दा संसदेत!

Issue of Amravati station relocation raised in Parliament : भू-माफियांच्या कारवायांची चौकशी व ‘आरओबी’च्या निर्मितीची मागणी

Amravati नादुरुस्त झालेल्या रेल्वे पुलाऐवजी त्याची नव्याने उभारणी न करता ‘मॉडेल’ रेल्वेस्थानकच स्थलांतरित करण्याचा प्रयत्न काही ‘अदृश्य’ शक्तींकडून सुरू आहे. ही कारवाई अमरावतीकरांच्या अस्मितेशी सरळपणे छेड करणारी असल्याचा आरोप संसदेत करण्यात आला. यावेळी अमरावती रेल्वेस्थानकाचे स्थलांतर कदापिही होऊ देणार नाही, असा इशाराही खासदारांनी दिला.

रेल्वेस्थानक हटविण्याच्या मागे भू-माफियांचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही खासदार बळवंत वानखेडे यांनी केला. त्याचवेळी त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात मांडली.

Kamptee Election : सुलेखा कुंभारेंवर ठोकणार ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा, बावनकुळे आक्रमक !

वानखडे यांनी सांगितले की, अमरावती रेल्वेस्थानक हे ब्रिटिशकालीन वारसा असून शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि नागरी विकासाचे प्रमुख केंद्र आहे. अशा महत्त्वपूर्ण स्थळाचे स्थलांतर करून त्या जागेवर व्यावसायिक प्रकल्पांना वाव देण्याचा प्रस्ताव पुढे नेला जात असल्याचे दिसत आहे. हा प्रस्ताव भू-माफियांना थेट फायदा पोहोचवणारा आणि शहराच्या हिताविरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमरावतीतील नागरिक, व्यावसायिक, उद्योगपती, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतून होत असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन त्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडे काही ठोस मागण्या सादर केल्या आहेत.

संसदेत करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या

1. स्थलांतर प्रस्ताव रद्द करा :
अमरावती रेल्वेस्थानक स्थलांतरित करण्याचा कोणताही प्रस्ताव असल्यास तो तात्काळ रद्द करावा.

Local Body Election : बाल्या बोरकरची दादागिरी, तरीही गुन्हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर !

2. उच्चस्तरीय चौकशी :
संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, उच्चस्तरीय आणि कालमर्यादित चौकशी करून भू-माफियांना मदत करणाऱ्यांना उघड करावे.

3. रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती :
स्टेशन चौक–राजकमल चौक आणि जयस्तंभ चौक दरम्यानचा उड्डाणपूल तातडीने दुरुस्त करून काम सुरू करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने द्यावेत.

4. विकास व सुविधा :
अमरावती रेल्वेस्थानकाच्या विकासाला गती देत प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध कराव्यात आणि आवश्यक त्या नवीन गाड्यांची मंजुरी द्यावी.

error: Content is protected !!