Claim of financial dealings in the Malkapur election : निवडणूक की पैशांचा मेळा?, व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय स्फोट
Malkapur नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अतिक जवारीवाले यांच्या नावाने ‘पाच ते सात कोटी रुपये खर्च’ अशा दाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मलकापूरच्या राजकारणात भूचाल आला आहे. दोन दिवसांत हा व्हिडिओ सर्वत्र फिरू लागला असून, तो खरा? संपादित? की राजकीय षड्यंत्राचा भाग? याबाबत अजूनही अधिकृत पुष्टी नाही.
निवडणूक आयोगाने अध्यक्षपदासाठी १० लाख रुपये खर्चमर्यादा निश्चित केली आहे. मात्र चर्चेत असलेला आकडा ७ कोटी — ही तफावतच निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्न अधिक तीव्र करते.
Local Body Election Counting : स्ट्राँगरूमवर कडक राजकीय पहारा!
जर दावा खरा असेल तर गंभीर, नाही तर राजकीय सापळा
व्हिडीओतील दावा खरा असल्यास—
निवडणुकीत पैशाचा उघड उघड वापर
मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न
लोकशाहीची थेट खिल्ली
पण, व्हिडिओ कापलेला किंवा संदर्भ तोडून बनवलेला असल्याची शक्यता तितकीच मजबूत आहे. सोशल मीडियात एखादे वाक्य कापून, जोडून, थांबवून व्हायरल करून प्रतिमा मलिन करणे ही आता राजकीय शस्त्रक्रिया बनली आहे.
अतिक जवारीवाले चुकीचे असू शकतात, बरोबरही असू शकतात. कारण—
▪ बहुतेक निवडणुकांत अधिकृत खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यात प्रचंड अंतर असते.
▪ कदाचित त्यांनी फक्त कार्यकर्त्यांशी ‘वास्तवातील आकडे’ बोलले असतील.
▪ त्याच संवादातील एक क्लिप बाहेर काढून तिचा अपवापर केला गेला असू शकतो.
म्हणूनच हा व्हिडिओ सत्याचा स्फोट आहे की राजकीय सापळा, हे ठरवण्याची जबाबदारी आता निवडणूक आयोगावरच आहे.
Winter Session : बोगस जातवैधता प्रकरणात मोठी कारवाई, अधिवेशन इम्पॅक्ट
आयोगाने तपास न करता प्रकरण थंडे बसू दिले, तर— लोकशाहीवरील नागरिकांचा विश्वास ढळेल. पैशांच्या बळावर चालणाऱ्या निवडणुकांचे कुरूप रूप लपून राहणार नाही. तपासात व्हिडीओ खरा निघाला, तर निवडणुकीतील बेहिशोबी खर्चाचा ‘काळा चेहरा’ उघड होईल. संपूर्ण जिल्ह्यात मोठे राजकीय परिणाम दिसतील.








