20 wards, 80 corporators; electorate exceeds 5.5 lakh : अकोला महानगरपालिका निवडणूक, अंतिम मतदारसंख्या जाहीर
Akola आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांतून ८० नगरसेवकांची निवड होणार आहे. यासाठी एकूण ५ लाख ५० हजार ६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यावेळी पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम मतदार संख्या जाहीर करण्यात आली आहे.
अंतिम आकडेवारीनुसार एकूण मतदारांची संख्या ५ लाख ५० हजार ६० इतकी असून, ही संख्या प्रारूप मतदार यादीतील ५ लाख ५० हजार १२८ मतदारांच्या तुलनेत ६८ ने कमी आहे. अंतिम यादीत पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येत किरकोळ घट झाली असून, इतर मतदारांची संख्या मात्र कायम आहे.
२८० कोटींचा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकर लोकांच्या सेवेत
अंतिम मतदार यादीनुसार २ लाख ७४ हजार ८७७ पुरुष मतदार, २ लाख ७५ हजार १४२ महिला मतदार आणि ४१ इतर मतदारांची नोंद आहे. प्रारूप यादीच्या तुलनेत पुरुष व महिला मतदारांच्या संख्येत प्रत्येकी ३४ मतांची घट झाली आहे. एकूण मतदारसंख्येत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा २६५ ने अधिक आहे.
प्रभागनिहाय आकडेवारीनुसार प्रभाग क्रमांक १८ मध्ये सर्वाधिक ३२ हजार १५९ मतदार आहेत. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक १४ मध्ये ३१ हजार ७८१ मतदारांची नोंद आहे. तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्वात कमी, म्हणजेच २१ हजार १८९ मतदार आहेत.
प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत प्रभागनिहाय बदल पाहता, प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक २२६ मतदारांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक १९, ३ आणि १ मध्येही मतदारसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.
सुधारित निवडणूक कार्यक्रम
प्रारूप मतदार यादीवरील हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर २०२५
मतदान केंद्रांच्या स्थळांची यादी प्रसिद्ध करणे : २० डिसेंबर २०२५
मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : २७ डिसेंबर २०२५
Maharashtra Police : भरतीतील ‘फसवणूक’ भोवली, न्यायालयाचा दणका
अंतिम मतदार संख्या (एकूण : ५,५०,०६०)
पुरुष मतदार : २,७४,८७७
महिला मतदार : २,७५,१४२
इतर मतदार : ४१








