Local Body Elections : १७ हजार मतदारांच्या हाती चार नगरसेवकांचा कौल; खामगावमध्ये पोटनिवडणुकीची रंगत

Four wards to go to by-elections on Saturday : चार प्रभागांत शनिवारी मतदान; १८ मतदान केंद्रांवर यंत्रे सील, राजकीय हालचालींना वेग

Khamgao शहरातील चार प्रभागांतील पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवारी मतदान होत असून, तब्बल १७ हजारांहून अधिक मतदार चार नगरसेवकांचा कौल देणार आहेत. या निवडणुकीत एकूण दहा उमेदवार रिंगणात उतरल्याने खामगावच्या राजकारणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

या चार जागांवरील मतदानानंतर रविवारी, २१ डिसेंबर रोजी खामगाव नगरपालिकेच्या एकूण ३५ नगरसेवकांच्या तसेच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा निकाल संपूर्ण नगरपालिकेच्या राजकीय गणितांवर प्रभाव टाकणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Local Body Elections : ‘मिनी मंत्रालय’ निवडणुकांसाठी प्रतिक्षाच; आरक्षण कार्यक्रम रखडल्याने राजकीय अस्वस्थता

निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून चार प्रभागांसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे मंगळवारी सकाळी ११ वाजता अधिकृतपणे सील करण्यात आली. चार प्रभागांसाठी एकूण १८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, तेवढीच मतदान यंत्रे वापरण्यात येणार आहेत. संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेता चार मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या महात्मा गांधी सभागृहात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्रांची तपासणी करून ती सील करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक यंत्रणेच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Election Counting : सत्ता कोणाची? बुलढाण्यात निकालाची घडी बसली!

प्रभागनिहाय मतदार संख्या :

प्रभाग ५ : ४,५०७ मतदार

प्रभाग ७ : ३,८४० मतदार

प्रभाग ९ : ४,३१५ मतदार

प्रभाग १६ : ४,४८५ मतदार

दरम्यान, अवघ्या चार जागांसाठी होणारी ही पोटनिवडणूक नगरपालिकेतील सत्तासमीकरणे बदलू शकते, यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांची धावपळ वाढली असून, खामगावचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.