Amravati municipal corporation election: भाजप–युवा स्वाभिमान आमनेसामने; बावनकुळेंकडून रवी राणांची मनधरणी

Clashes between BJP and Yuva Swabhiman : फॉर्म हाऊसवर घेतली भेट, अमरावतीत हाय व्होल्टेज ड्रामा

Amravati : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान या मित्र पक्षांचे उमेदवार अनेक प्रभागांत एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी आमदार रवी राणा यांच्या फार्महाऊसवर भेट देत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, युवा स्वाभिमान पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४१ पैकी १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, अद्याप २९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असल्याने भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यात अनेक प्रभागांत आता मैत्रीपूर्ण लढती रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Local body elections : मयत शिक्षकांनाच निवडणूक ड्युटी; ‘ऑर्डर कोण पोहोचवणार?’

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी भाजपकडून आठ जागा सोडण्यात आल्या होत्या. तरीही युवा स्वाभिमानने ४१ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी २९ उमेदवार अद्याप कायम आहेत.
दरम्यान, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या विरोधात आमदार रवी राणा यांनी सचिन भेंडे या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे रवी राणा आणि तुषार भारतीय यांच्यातील राजकीय संघर्षाला पुन्हा ठिणगी पडल्याचे चित्र आहे.