व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Raut : अजित पवारांनी मूळ राष्ट्रवादीत यावं…

Sanjay Raut : अजित पवारांनी मूळ राष्ट्रवादीत यावं…

Why stay in the government? Sanjay Raut said bluntly : सरकारमध्ये राहताय कशाला? संजय राऊत बिनधास्त म्हणाले

Mumbai: महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार सत्तेत असताना, सत्ताधारी घटकांमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर केलेल्या जोरदार टीकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा आणि शरद पवारांसोबत परत येण्याचा सल्ला दिला आहे. राऊत यांनी भाजपवरही घणाघाती शब्दांत टीका करत ‘भाजप ही वॉशिंग मशीन असून अमित शाह हे वॉशिंग पावडर आहेत’ असा आरोप केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी भाजपवर आरोप करत सत्तेचा माज आल्याची टीका केली होती. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असूनही आम्ही कधी उन्माद केला नाही, मात्र आता उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी केला. या वक्तव्यामुळे महायुतीतील विसंवाद उघडपणे समोर आला असून, विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी मिळाली आहे.

अखेर कारनाम्यांना लगाम! शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित

याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसत असल्याचं सांगत, त्यांचा इरादा वेगळ्या दिशेने जाण्याचा असल्याचा दावा राऊत यांनी केला. भाजप ‘खा खा खातोय’ आणि त्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून इतर पक्षांतील भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतानाच अजित पवार हे त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून बसले आहेत, मग जनतेने नेमकं काय समजायचं, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. एकीकडे भाजपने तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि आता तुम्ही भाजपवर आरोप करता, तर मग सरकारमध्ये राहताय कशाला, कशा करता राहता सरकारमध्ये, असा थेट सवाल त्यांनी केला.

संजय राऊत यांनी अजित पवारांना स्पष्ट शब्दांत आवाहन केलं की, भाजपची साथ सोडा आणि शरद पवारांसोबत मूळ राष्ट्रवादीत परत या. नाही तरी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात अजित पवार यांनी शरद पवारांसोबत युती केलेलीच आहे, मग उघडपणे मूळ राष्ट्रवादीत विलीन व्हायला काय हरकत आहे, असंही राऊत म्हणाले. अमित शाह यांनी दिलेला पक्ष हा मूळ राष्ट्रवादी नाही, मूळ राष्ट्रवादी हा शरद पवारांचा आहे, असं सांगत राऊत यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे, पण अमित शाह यांच्या मस्तीपायी आणि माजोरडेपणामुळे हे पक्ष त्यांच्या हातात गेले, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपवर हल्लाबोल करताना संजय राऊत यांनी ‘वॉशिंग मशीन’ उपमा पुन्हा एकदा वापरली. भाजप ही वॉशिंग मशीन असून अमित शाह हे वॉशिंग पावडर असल्याचं म्हणत, भाजपच्या मशीनमध्ये घातलं की सगळे भ्रष्टाचारी स्वच्छ होतात, अशी खोचक टीका त्यांनी केली. अजित पवार, अशोक चव्हाण यांची उदाहरणं देत, जे नेते कालपर्यंत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली होते, तेच आज भाजपमध्ये गेल्यावर पवित्र कसे झाले, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप भाजपनेच केला होता, हे आठवण करून देत राऊत म्हणाले की, भोपाळमधील भाजपच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान स्वतः जबाबदारीने बोलले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच अजित पवार मंत्रिमंडळात आले. मग त्या सिंचन घोटाळ्याचं पुढे काय झालं, याचं उत्तर फडणवीस आणि पंतप्रधानांनी द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.

Local body elections : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांवर भाजपला मदत केल्याचा आरोप

त्याचप्रमाणे आदर्श घोटाळ्याच्या श्वेतपत्रिकेचा मुद्दा उपस्थित करत अशोक चव्हाण यांचाही उल्लेख राऊत यांनी केला. काँग्रेसच्या काळात ज्या आदर्श घोटाळ्यावर भाजपने गदारोळ केला, त्याच घोटाळ्यातील नाव असलेले अशोक चव्हाण आज भाजपमध्ये सन्मानाने सामील झाले, मग त्या श्वेतपत्रिकेचं काय झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या भाजपविरोधी वक्तव्यामुळे महायुतीत निर्माण झालेला तणाव आणि त्यावर संजय राऊतांनी केलेली थेट टिप्पणी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

error: Content is protected !!