व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Narayan Rane : नारायण राणे राजकारणातून निवृत्त होणार?

Narayan Rane : नारायण राणे राजकारणातून निवृत्त होणार?

Ex-minister signals possible exit from active politics : पूर्णविराम घेणार असल्याचे केले विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

Mumbai माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्गातील या कार्यक्रमात राणे यांनी दीर्घकाळ राजकारण केल्यानंतर आता विश्रांती घेण्याची वेळ आली असल्याचे सूचित केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात राणे सक्रिय राहणार की निवृत्ती घेणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

नारायण राणे यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यानंतर ते काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्षात दाखल झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मात्र, आता त्यांनी स्वतःच राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Thane Municipal Elections : निवडणूक अर्ज मागे घेताना नेमकं काय घडलं?, मनसेने घेतला शोध

या कार्यक्रमात नारायण राणे म्हणाले, “मी अनेक वर्षे विविध पदांवर राहिलो असतो, पण राजकारणात ‘कारस्थान’ नावाचा एक शब्द आहे. त्याचा अडथळा तेव्हाही आला आणि आताही आला. पण आता मी ठरवले आहे की, या शब्दाला पूर्णविराम द्यायचा आणि आपण घरी बसायचे.”

तसेच नारायण राणेंनी भावुक होत आपल्या मुलांनाही संदेश दिला, “माझी दोन्ही मुलं चांगली आहेत. चांगलं काम करत आहेत. मी दोन्ही मुलांना एकच सांगेन, नांदा सौख्यभरे.” काही दिवसांपूर्वी नितेश आणि निलेश राणे यांच्यात राजकारणावरुन वाद झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्यव्य केले आहे.

PMC election: एकाच घरातून पती-पत्नी, आई-मुलगा, भाऊ-भाऊ अशा १२ हून अधिक जोड्या रिंगणात

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. निलेश राणे यांनी खासदार म्हणून काम केले आहे, आता ते शिवसेनेचे आमदार आहेत. तर नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे राणे कुटुंबातील पुढील राजकीय दिशा काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नारायण राणे निवृत्त झाल्यास त्यांच्या जागी निलेश आणि नितेश यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

error: Content is protected !!