Devendra Fadnavis gives suggestive message to Ajit Pawar in one sentence : देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात अजित पवारांना सूचक संदेश
Pune : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर देत वाद वाढवू नये असा सूचक संदेश दिला आहे. “आपण जेवढं मागे जाऊ तेवढा वाद वाढेल,” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना संयमाचा सल्ला दिला. ते सोमवारी पुण्यातील कात्रज चौकात आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
अजित पवार यांनी अलीकडेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. “ज्यांनी ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना,” असे विधान अजित पवारांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
या वक्तव्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणी आम्हाला काय काम केले हे विचारणार असेल, तर त्यांनी एकदा आरशात पाहावे. ते दादा बोलत आहेत की दुसरे दादा बोलत आहेत, हेच कळत नाही. निवडणुका जवळ आल्याने वातावरण तापत आहे. मात्र, जुने मुद्दे उकरून काढले तर वाद अधिकच वाढतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
unopposed seats : ‘बिनविरोध’ ही संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकाळातील पुण्याच्या विकासावर भर दिला. पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला आहे. त्यामुळे आरोप करण्याआधी वस्तुस्थिती तपासली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, याच मुद्द्यावर काल झालेल्या सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा तीव्र समाचार घेतला. अजित पवार म्हणतात की पिंपरी आणि पुण्यात विकास झाला नाही, पण याआधी अनेक वर्षे सत्ता तुमच्याकडेच होती, तेव्हा विकास का झाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. २००१ ते २०१७ या काळात मेट्रो का झाली नाही, मेट्रो आम्ही आणली, तुमची फक्त कागदावरच राहिली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
Municipal elections : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल !
अजित पवार जनता खुळी नाही, उड्डाणपूल, मेट्रोसारखी मोठी कामे आम्ही केली आहेत, अशी कामांची यादी सांगता येईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. “दमानं घेऊ नका आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत हे विसरू नका,” असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
एकीकडे महायुतीत एकत्र सत्तेत असताना दुसरीकडे सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
__








