Amravati Municipal Council : अमरावती मनपात स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली

Amravati civic body sees a rise in nominated corporators : ५ वरून थेट ९, मनपा अधिनियमात केलेल्या सुधारणांमुळे बदल

Amravati अमरावती महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ वरून थेट ९ झाली आहे. सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के किंवा कमाल १० सदस्य अशी तरतूद मनपा अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणेमुळे ही वाढ झाली आहे.

हे स्वीकृत नगरसेवक महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी होणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्या बैठकीत निवडले जाणार आहेत. मतमोजणीच्या दिवसापासून साधारण महिनाभरात पहिली बैठक घेण्याचे निर्देश आहेत.

गेल्या निवडणुकीत स्वीकृत नगरसेवकांची संख्या केवळ पाच होती. मात्र, २३ मार्च २०२३ रोजी राज्य शासनाने मनपा अधिनियमात केलेल्या सुधारणांमुळे हा बदल झाला आहे. वाढीव स्वीकृत सदस्यसंख्येचा फायदा पालिकेतील सर्वच राजकीय पक्षांना तसेच नवनिर्वाचित सदस्यांनी स्थापन केलेल्या गटांना होणार आहे.

Akola Municipal Council : भाजप सत्तेसाठी फोडाफोडीची ‘मशाल’ पेटवणार!

पहिल्या बैठकीचा क्रम निश्चित करण्यात आला आहे. सर्वप्रथम महापौर व उपमहापौरांची निवड होईल. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नावांना मंजुरी देण्यात येईल आणि शेवटी स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाईल.

अमरावती महानगरपालिकेतील लोकनिर्वाचित सदस्यांची संख्या ८७ आहे. या संख्येच्या दहा टक्के प्रमाणे ८.७ सदस्य होतात. नियमानुसार अपूर्णांकातील संख्या नजीकच्या पूर्णांकात रूपांतरित केली जात असल्याने, अमरावती मनपेत नऊ स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.

स्थायी समितीचे १६ सदस्य निवडण्याचा विषय हा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर हाताळला जातो. या निवडीसाठी सभागृहातील पक्ष तसेच अपक्ष नगरसेवकांनी स्थापन केलेल्या गटांतील सदस्यसंख्या विचारात घेतली जाते. कायद्यानुसार, प्रत्येक गटाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाते.

Buldhana Municipal Council : बुलढाणा नगरपालिकेत गायकवाड गटाची सत्ता; स्थायी समितीची निवड ‘३३ विरुद्ध १’!

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप २५ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाकडे (वायएसपी) प्रत्येकी १५ नगरसेवक आहेत. एमआयएमकडे १२, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे ११ नगरसेवक आहेत.
शिवसेना (शिंदे गट) आणि बहुजन समाज पार्टीकडे प्रत्येकी ३ नगरसेवक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे २, तर युनायटेड फोरममध्ये सहभागी असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडे १ नगरसेवक आहे. विविध समित्यांवर प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी या पक्षांना किंवा अपक्षांना संयुक्त गट स्थापन करणे आवश्यक ठरणार आहे.
अमरावती मनपाच्या स्थायी समितीची सदस्यसंख्या १६ असून, शिक्षण, विधी, शहर सुधारणा तसेच महिला व बालविकास आदी इतर समित्यांमध्ये प्रत्येकी ९ सदस्य असतात.