Ajit pawar: मला कंटाळा आलाय, आता थांबावं वाटतंय !

Ajit Dada speech was in news few days ago : अजित दादांचं काही दिवसांपूर्वीच भाषण चर्चेत

Mumbai: अजित दादा पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समोर येताच कार्यकर्ते आणि अजित दादांच्या चाहत्यांनी बारामती मध्ये एकच गर्दी केली आहे. तर दुसरीकडे समाज माध्यमांवर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. यात अनेकांनी त्यांच्यासोबत काढलेले फोटो शेअर केले आहेत, तर अनेकांनी त्यांच्या भाषणांच्या क्लिप्स आणि रील्स वायरल केल्या आहेत.

अजितदादांचा मिश्किल स्वभाव, हजर जबाबीपणा त्यांनी वेगवेगळ्या विषयावर केलेले मार्गदर्शन यांनी सध्या समाज माध्यमे भरून गेले आहेत. यात त्यांचे काही दिवसापूर्वी केलेले एक भाषण लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये त्यांनी राजकारणातील ताणतणाव, अपयश आणि सातत्याने होणाऱ्या टीकेवर मानसिक थकवा जाणवत आहे अशी भावना व्यक्त केली होती. सध्याच्या सर्व राजकीय परिस्थिती चा आता कंटाळा आला आहे. कुठेतरी थांबावं वाटतं अशा आशयाचे ते विधान या घटनेकडे जोडून पाहिले जात आहे
तर दुसऱ्या एका भाषणात त्यांनी वेगळ्या संदर्भाने बोलताना वरच्याचे बोलावणे आले की, सगळं इथेच सोडून जावं लागतं याचीही आठवण नुकतीच करून दिली होती.

ZP elections : जिल्हा परिषद निवडणुका बाबत संभ्रमाची स्थिती!

त्यांच्या अलीकडेच व्हायरल होत असलेल्या भाषणांच्या क्लिप्स नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या प्रचारातल्या आहेत. त्यातील त्यांनी दिलेले संदेश मात्र आता
या घटनेमुळे मनाला अधिक चटका देऊन जात आहेत. यात त्यांनी सुरुवातीला मी राजकारणात यायला इच्छुक नव्हतो. मात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकातून राजकीय प्रवास सुरू झाला, आणि काळानुसार राजकीय वाटचाल आणि स्वभावात सुद्धा बदल होत गेला आयुष्याकडे पाहण्याचे विचारही प्रगल्भ होत गेले हे पण त्यांनी नमूद केल्याचे पाहायला मिळते.

Ajit Pawar death news : राजकारणातला दिलदार विरोधक आणि शब्दाला पक्का सहकारी हरपला

कार्यकर्त्यांना संबोधित करताना आणि आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना आपल्या राजकीय वाटचालीची यात आलेल्या अनुभवांची माहिती देतानाच त्यांनी जीवनाबद्दल राजकारणाबद्दल प्रगल्भतेबद्दल उदाहरण देऊन एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र योगायोगाने वर्षाचे बोलावणे आल्यावर जावेच लागते, किंवा आता थांबावे वाटते असे संदर्भ आता चर्चेचा आणि काल घडलेल्या घटनेच्या संदर्भाने पाहिले जात असून ते सर्वसामान्यांना अधिक भाऊ करताना पाहायला मिळत आहेत.