Akola Airport Development : अकोला विमानतळाला संत गजानन महाराजांचे नाव द्या

Demand-to-name-akola-airport-after-sant-gajanan-maharaj : केंद्र सरकारकडे आग्रही मागणी, विमानतळ विस्तारीकरण आणि धावपट्टीच्या कामालाही मिळणार गती

Akola विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीचे आराध्य दैवत संत गजानन महाराज यांचे नाव अकोला विमानतळाला देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, अकोल्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक दुवा लक्षात घेता हे नामकरण भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

शेगाव संस्थानचे आध्यात्मिक कार्य आणि तिथली शिस्त जगभर प्रसिद्ध असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी अकोल्यातून विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला महाराजांचे नाव दिल्यास तो विदर्भातील कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा सन्मान ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विदर्भातील भाविकांच्या भावना लक्षात घेता हे पाऊल ऐतिहासिक ठरेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. केवळ नामकरणच नव्हे, तर अकोला विमानतळाच्या रखडलेल्या विस्तारीकरणालाही आता वेग मिळणार आहे.

Shikshak Bank : निविदा न काढताच शिक्षक बँकेकडून कोट्यवधींची साहित्य खरेदी

राज्य शासनाने विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली असून, जिल्हा प्रशासनाकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लवकरच विमानतळाच्या १८ मीटर रुंदीच्या धावपट्टीचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असून, यामुळे मोठ्या विमानांच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

BJP OBC front : एसटी आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर; भाजपविरोधात निवडणुकीचा इशारा

अकोला विमानतळाचा कायापालट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये विशेष पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करणे तसेच छोट्या विमानसेवेबाबत नामवंत कंपन्यांशी चर्चा करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे. अकोला आणि शेगावमधील भौगोलिक अंतर कमी असल्याने, या विमानतळामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय स्तरावर सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे अकोला विमानतळ आता लवकरच कार्यान्वित होईल आणि विदर्भाच्या विकासात हे विमानतळ एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.