
chandrapur-municipal-corporation-power-struggle-congress-bjp-shivsena : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेसाठी जोरदार संघर्ष
Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.काँग्रेसने निवडणुकीदरम्यान सर्व गट एकत्र करत मोठी ताकद पणाला लावली, मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ राखण्यात पक्ष अपयशी ठरला. निकालानंतर लगेचच राजकारणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, सध्या महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
काँग्रेसमधील खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वाद या सत्तासंघर्षाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. निवडून आलेले नगरसेवक दोन गटांमध्ये विभागले गेले असून, खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नगरसेवकांच्या नोंदणीपासून ते त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवण्यापर्यंतच्या घडामोडी समोर आल्या असून, या ‘बिहार स्टाईल’ राजकारणामुळे काँग्रेसची अडचण वाढली आहे.
sanjay raut : अजित पवारांचा पक्ष पटेलांचा नाही त्यांनी चिडचिड करू नये!
या परिस्थितीत काँग्रेसचे दोन्ही गट मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भाजप आणि त्यांचे मित्र पक्षही संख्याबळाची चाचपणी करत सक्रिय झाले असून, महापालिकेतील सत्ता गणिते वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ठाकरे गट भाजपला पाठिंबा देणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडताना थेट होकार दिलेला नसला, तरी त्यांनी “महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल, तेच केलं पाहिजे,” असे विधान केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
india Us trade deal : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता
चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील वाद, भाजपची रणनीती आणि ठाकरे गटाची संभाव्य भूमिका या सगळ्या घटकांमुळे सत्तासंघर्ष अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. येत्या काही दिवसांत कोणत्या बाजूने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
____








