व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण sanjay raut : अजित पवारांचा पक्ष पटेलांचा नाही त्यांनी चिडचिड करू नये!

sanjay raut : अजित पवारांचा पक्ष पटेलांचा नाही त्यांनी चिडचिड करू नये!

संजय राऊतांचा पटेल आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल : sanjay-raut-criticism-on-ajit-pawar-party-bjp-praful-patel

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवारांच्या पक्षाबाबत बोलताना त्यांनी “अजित पवारांचा पक्ष हा पटेलांचा पक्ष नव्हता,” असे ठामपणे सांगत प्रफुल्ल पटेल यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी या विषयावर चिडचिड करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले.

संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे राज्यातील महत्त्वाचे नेते होते आणि पवार कुटुंबातील एक कर्ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पक्षासंदर्भातील निर्णय हा अंतर्गत आणि कौटुंबिक स्वरूपाचा होता. प्रत्येक निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणे आवश्यक आहे, हा हट्ट अनाठायी असल्याची टीकाही त्यांनी केली.

india Us trade deal : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता

पवार कुटुंबातील शोककाळावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हिंदू संस्कृतीनुसार तेरा दिवसांचा शोक पाळला जातो. पवार कुटुंबाची विचारधारा वेगळी असून, या विषयावर बाहेरून भाष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपवर हल्ला चढवताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. “इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही भाजपची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे,” असे विधान करत त्यांनी भाजपच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमित शाह यांच्या आदेशानुसारच अनेक पक्षांचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Ban on purchases : राज्यात नवीन खरेदी व निविदांवर तात्काळ बंदीचे आदेश !

अजित पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्यांनी भाजपसोबत जाताना स्वतःची विचारधारा सोडली नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख कायम ठेवली, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील घडामोडींवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

error: Content is protected !!