Mayoral election : ठाणे, कल्याण अन् उल्हासनगरवर युतीचा भगवा; बिनविरोध निवडीने विरोधकांची सपशेल माघार!

mahayuti-wins-mayor-elections-in-thane-kalyan-and-ulhasnagar-unopposed : ठाण्यात शर्मिला पिंपोलकर, तर कल्याणमध्ये हर्षाली चौधरींच्या गळ्यात महापौरपदाची माळ

Thane ठाणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीनही महानगरपालिकांवर महायुतीने (शिवसेना शिंदे गट आणि भाजप) आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सन २०२६ च्या महापौर निवडणुकीत या तीनही ठिकाणी युतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने, सुमारे ३ वर्षे १० महिन्यांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात आली आहे. विरोधकांनी या निवडणुकीतून सपशेल माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात महायुतीच्या ताकदीची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या विशेष सभेत जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडीची घोषणा केली. शिवसेनेच्या शर्मिला पिंपोलकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. या निवडीमुळे ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचे शासन सुरू झाले आहे.

Municipal Election: चंद्रपुरात काँग्रेसची गटबाजी, भाजपची हालचाल अन् ठाकरे गटाची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत प्रदीर्घ काळानंतर महापौर आणि उपमहापौर पदे भरण्यात आली आहेत. तब्बल सहा वर्षांच्या प्रशासकीय आणि राजकीय प्रतिक्षेनंतर आज या शहराला नवे नेतृत्व मिळाले. शिवसेनेच्या (शिंदे गट) हर्षाली थविल-चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे राहुल दामले यांनी उपमहापौरपदाची धुरा सांभाळली आहे. या निवडीचा उत्साह संपूर्ण सभागृहात पाहायला मिळाला.

उल्हासनगरमध्येही महायुतीने विजयाची परंपरा कायम राखली. येथेही उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर युतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवसेना (शिंदे गट) तर्फे अश्विनी कमलेश निकम यांची महापौरपदी निवड झाली. भाजपचे अमर लुंड हे नवे उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आले.

Mayoral election : मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपणार;

या तीनही महापालिकांमध्ये एकाही विरोधी उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने निवडणूक प्रक्रिया केवळ औपचारिक ठरली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी या संघर्षात कोणतीही लढत न दिल्याने युतीचे उमेदवार सहज निवडून आले. या विजयामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी गणितांवरही महायुतीचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे.