congress-strategy-change-harshwardhan-sapkal : लातूर-कोल्हापूरच्या धक्क्यातून सावरण्यासाठी काँग्रेसची नवी फिल्डिंग
Buldhana राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. लातूर, सांगली आणि कोल्हापूर यांसारखे काही बालेकिल्ले सोडले तर काँग्रेसला इतरत्र मोठा फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या स्वजिल्ह्यात, म्हणजेच बुलढाण्यात आता काँग्रेस आपली रणनीती पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी रणसंग्रामात सपकाळ आपल्या जिल्ह्यात पक्षाला पुन्हा ‘नंबर वन’ करण्यासाठी कोणते नवे डावपेच आखतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसची ताकद मोठी आहे, मात्र अलीकडच्या निकालांनी पक्षासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जिल्ह्याातील पालिका निवडणुकांत काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून यश मिळवले होते. हाच जनाधार जिल्हा परिषदेत कायम राखण्यासाठी आता पक्षाला कसरत करावी लागणार आहे. हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः याच जिल्ह्याचे असल्याने, इथला निकाल त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या प्रतिमेसाठी निर्णायक ठरणार आहे.
Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेत काँग्रेसच्या युवा नेत्याला विरोधी पक्षनेतेपदाची संधी
काँग्रेसच्या पराभवामागे महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांमधील अंतर्गत ओढाताण कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्ष काँग्रेसच्या जागांवर डोळा ठेवून असल्याने, आता सपकाळ काही जागांवर स्वतंत्र ताकद आजमावणार की ‘उबाठा’ व ‘राष्ट्रवादी’सोबत नवा तडजोड फॉर्म्युला आणणार, यावर खलबतं सुरू आहेत. आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देऊन संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
Nagpur Municipal Corporation : अखेर एमआयएम-मुस्लिम लीगची युती, काँग्रेसचे प्रयत्न फसले
लोकसभा आणि विधानसभेतील अपयशानंतर बुलढाणा जिल्हा परिषद ही काँग्रेससाठी ‘कमबॅक’ची मोठी संधी आहे. जर सपकाळांनी आपल्या जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणले, तरच राज्याच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव अधिक गडद होईल. अन्यथा, विरोधकांकडून पुन्हा एकदा सपकाळांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.








