maharashtra-legislative-council-governor-quota-5-vacant-seats-update : स्थानिक स्वराज्य संस्थांत कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्याची शक्यता
Mumbai : महाराष्ट्र विधान परिषद मधील राज्यपाल नियुक्त कोट्यातील पाच रिक्त जागांबाबत हालचालींना वेग आला असून या जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. सध्या ५५ सदस्य कार्यरत असून २३ जागा रिक्त आहेत. यापैकी १४ मे २०२६ रोजी आणखी ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या जागा विधानसभेतील आमदारांकडून निवडून दिलेल्या आहेत. मुदत संपणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. सध्या विधानसभेत २८६ आमदार असल्याने निवडणुकीत सुमारे ३६ आमदारांच्या मतांचा कोठा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Transfer policy : सहा वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये सक्तीच्या बदल्या
राज्यपाल कोट्यातून एकूण १२ सदस्यांची नियुक्ती केली जाते. साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील व्यक्तींना या कोट्यातून संधी दिली जाते. सध्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी विविध पक्षांकडून हालचाली सुरू झाल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या किंवा संघटनात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींना या वेळी संधी मिळू शकते, अशी राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यांत विधान परिषद आणि राज्यसभेतील बदलांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यसभा मधील महाराष्ट्रातील सात जागा २ एप्रिल २०२६ रोजी रिक्त होणार आहेत. मुदत संपणाऱ्यांमध्ये शरद पवार, रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि फौजिया खान यांचा समावेश आहे.
Tukaram Mundhe : १३ वर्षांत ९०० बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द!
विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील नियुक्त्या आणि आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








