bacchu-kadu-criticizes-bjp-government-tender-scam-smart-meter-issue : ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणणारेच भ्रष्टाचारात मग्न; औषध खरेदीतील कमिशनवरून माजी मंत्र्यांचा निशाणा
Amravati राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. “सरकारने टेंडर प्रक्रियेचा बाजार मांडला असून पारदर्शकतेचा अभाव निर्माण झाला आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना कडू यांनी भाजपवर अविश्वासाचे वातावरण असल्याचे सांगत, जनतेच्या खिशावर ‘स्मार्ट मीटर’च्या माध्यमातून दरोडा टाकला जात असल्याची टीका केली.
बच्चू कडू यांनी मंत्रालयातील औषध खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पूर्वी सिव्हिल सर्जन स्तरावर होणारी औषध खरेदी आता मंत्रालयातून होत आहे. यामुळे स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष होत असून केवळ कमिशनसाठी हा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचारात औषधांच्या किमती भरमसाठ वाढल्या असून याचा फटका थेट रुग्णांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
Narhari Zirwal : झिरवळ म्हणतात, ‘लाच प्रकरणात दोषी आढळलो तर तत्काळ राजीनामा देईन’
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कडू यांनी सरकारला आरसा दाखवला. दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर न देणे ही अत्यंत गंभीर बाब असून सरकार संवेदनहीन झाल्याची टीका त्यांनी केली. मनरेगाच्या निधी वितरणात होणारा विलंब आणि कामांमधील अनियमितता यामुळे ग्रामीण अर्थचक्र कोलमडल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर कडू यांनी कडाडून टीका केली. “एकीकडे आर्थिक मदतीच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे ‘स्मार्ट मीटर’ बसवून लोकांकडून पैसे वसूल करायचे, हा जनतेचा अपमान आहे,” असे ते म्हणाले. “शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळालीच पाहिजे. जर सरकारने दुर्लक्ष केले, तर आम्ही गनिमी काव्याने आंदोलन छेडू,” असा इशारा त्यांनी दिला.
Nagpur Municipal corporation : भाजपने ठरवला स्वीकृत सदस्यांचा फॉर्म्युला; कोणाची लागणार लॉटरी?
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. या दुःखद घटनेनंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत आणि वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर, बच्चू कडू यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका आगामी निवडणुकीत महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते.








