Siddharth Kharat : माजी मंत्री धडकले विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर

Ex-minister Subodh Saoji concerns about pending development works : मतदारसंघातील समस्या आणि अपूर्ण विकासकामांचा वाचला पाढा

Mehkar मेहकर मतदारसंघातील वाढत्या समस्या आणि अपूर्ण विकासकामांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कार्यालयात थेट धडक देत जाब विचारला. २० फेब्रुवारी रोजी शेतकरी व नागरिकांसह झालेल्या या भेटीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

“मी माजी मंत्री म्हणून नव्हे, तर मतदार म्हणून आलो आहे,” असे सांगत सावजी यांनी पाणीटंचाई, अतिक्रमण, कर्जमाफी, रस्त्यांची दुरवस्था आदी प्रश्नांवर आमदारांना घेरले. “मी आमदार असतो तर जेसीबीखाली झोपलो असतो,” असे विधान करत त्यांनी पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली.

Gram Panchayat ELections : मोताळा तालुक्यातील ५२ गावात राजकारण तापणार

मेहकर शहर व ग्रामीण भागात कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना राबवल्या, मात्र गावकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. अतिक्रमित जागांवरील ‘सरकारी’ नोंदीमुळे घरकुल व शासकीय योजनांचा लाभ न मिळाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच मेहकर-डोणगाव रस्ता प्राधान्याने का होत नाही, असा सवालही त्यांनी केला.

Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुका लांबल्याने इच्छुकांना ‘विश्रांती’

यावर आमदार सिद्धार्थ खरात यांनी, “मला केवळ एक वर्ष झाले आहे. मी विरोधी पक्षाचा आमदार असल्याने निधी आणण्यात अडचणी येतात. समस्या जुन्याच आहेत; त्यावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत,” असे स्पष्टीकरण दिले.

या चर्चेमुळे मेहकर मतदारसंघात सत्ताधारी व विरोधी भूमिकांमध्ये राजकीय चुरस वाढण्याची चिन्हे दिसत असून आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.