Vijay Wadettiwar : ज्यांनी अफवा पसरवली त्यांना पागल कुत्रा चावला असेल, वडेट्टीवारांचा टोला कुणाला?

Those who spread the rumors must have been bitten by a mad dog,who was Vijay Wadettiwar targeting with this remark?मी कोणाची माफी मागितली नाही असे म्हणत वडेट्टीवारांनी वृत्त फेटाळून लावले

Nagpur – दोन नेत्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्ता गमावावी लागली. त्यांचा महापौरपदाचा उमेदवार एक मताने पराभूत झाला. याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे. दोन्ही नेत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हायकमांडची माफी मागितल्याचा दावा केला जात होता. अशी माध्यमात चर्चा होती. मात्र हे वृत्त वडेट्टीवार यांनी फेटाळून लावले. कोणीतरी ही बातमी पसरवली आहे. ज्याने कोणी ही अफवा पेरली त्याला पागल कुत्र्याने चावले असावे असा टोला त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगवला.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर वडेट्टीवार काही नगरसेवकांना नागपूरला आणले होते. त्यावरून चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. वडेट्टीवार यांनी आपले समर्थक सर्वाधिक असल्याने महापौरपदावर दावा केला होता. मात्र खासदार धानोरकर यांना तो मान्य नव्हता. त्यानंतर धानोरकर यांना आपल्या १३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आणि गटनेताही निवडला होता.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचा महापौर २४ कॅरेट शुद्ध भाजपचाच, भिवंडीत तुमचा आहे का?

त्यानंतर प्रदेश काँग्रेसने या वादात उडी घेतली. दोन्ही नेत्यांसोबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठक घेतली. महापौरपद धानोरकर तर वडेट्टीवार यांना उपमहापौर व स्थायी समिती देण्याचे ठरवण्यात आले होते. हे दोन्ही नेत्यांनी सर्वांसमोर वरवर मान्य केले होते. मात्र संमती कोणाचीच नव्हती. शेवटी हा वाद दिल्लीपर्यंत पोहचला. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी दोघांनाही दिल्लीत बोलावून घेतले होते. दिल्लीत झालेल्या बैठकीतही महापौरपद धानोरकर यांच्या समर्थकांना देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे वडेट्टीवारांचा नाईलाज झाला.

Siddharth Kharat : माजी मंत्री धडकले विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर

सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या नगरसेवकांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी खासदारांवर सोपवण्यात आली. मात्र उद्धव ठाकरे सेनेची समजूत काढण्यात कोणालाच यश आले नाही. विजय वडेट्टीवार यांचे समर्थक अपक्ष निवडून आलेले दोन नगरसेवकही भाजपकडे गेले. त्यामुळे काँग्रेसला सर्वच गमवावे लागले. या पराभवाची चौकशी करण्याचे आदेश प्रदेश काँग्रेसने दिले असून चौकशी समितीचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यानंतर वडेट्टीवार यांनी माफी मागून आपली सुटका करून घेतली अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र हे वृत्त वडेट्टीवारांनी फेटाळून लावले.