maharashtra-milk-price-hike-from-1-march-2-rupees-per-litre-increase : प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, खरेदी-विक्री दरातही बदल
Mumbai : राज्यातील ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून येत्या १ मार्चपासून दूध दरात वाढ लागू होणार आहे. खासगी दूध संघांच्या बैठकीत प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून ग्राहकांना प्रत्येक लिटरमागे २ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
दूध संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दूध खरेदी दरात ४ रुपयांची वाढ झाल्यामुळे विक्री दरात वाढ करणे अपरिहार्य ठरले. विक्री व्यवस्थापनातील वाढीव खर्च लक्षात घेता संघाच्या मार्जिनमध्ये १ रुपयांची वाढ करण्यात आली असून वितरकांच्या कमिशनमध्येही १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या मासिक खर्चात वाढ होणार असून घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) या संस्थेनेही दूध दरात बदल जाहीर केला आहे. गोकुळकडून म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयांची वाढ करण्यात आली असून तो दर आता ५३.५० रुपये झाला आहे. यापूर्वी हा दर ५२.५० रुपये होता. तसेच गाईच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून तो दर ३६ रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी गाईचे दूध ३४ रुपये दराने खरेदी केले जात होते. या वाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
AI Summit in Delhi 2026 : नागपुरात भाजयुमो विरुद्ध युवक काँग्रेस आमनेसामने!
विक्री दरातही बदल करण्यात आला असून गोकुळकडून म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ६८ रुपये दराने विकले जाणारे दूध आता ७० रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Grampanchayat Elections : कार्यकाळ संपुष्टात आला, आता ५५५ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक!
एकीकडे शेतकऱ्यांना वाढीव खरेदी दराचा फायदा होत असला तरी दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. राज्यभरात १ मार्चपासून लागू होणाऱ्या या दरवाढीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








