Shivani Dani : वडेट्टीवारांचे भाकित अन् तसेच घडले, दाणींच्या हाती महापालिकेची तिजोरी!

Shivani-dani-sanding-committee-chairman-nagpur-municipal-corporation-vijay-wadettiwar-prediction : मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील गुंतवणूक सल्लागार झाल्या स्थायी समिती सभापती 

Nagpur महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजप कोणाकडे सोपवणार याची चर्चा महिनाभरापासून नागपूरमध्ये सुरू होती. अखरे प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविका शिवानी दाणी यांचे नाव अखेर आज जाहीर करण्यात आले. दाणी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यालयातील गुंतवणूक सल्लागार आहेत.

मंगळवारी झालेल्या विशेष सभेत स्थायी समिती सदस्यांची नावे घोषित करताना महापौर नीता ठाकरे यांनी शिवानी दाणी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर पुकारले. त्यानुसार शिवानी दाणी या नागपूर महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नागपूर महापालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्यानंतर या पदावर शिवानी दाणी यांची वर्णी लागेल अशीच चर्चा होती.

Budget session 2026 : “मंत्रालय चालते पगारावर, फाईली चालतात पैशावर”!

परंतु पहिल्यांदाच त्या निवडून आल्याने थेट महापौर केल्यास इतर नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर लक्षात घेता भाजपने ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ टाकली. त्यामुळे दाणी यांना मनपातील आर्थिक बाबींशी संबंधित असलेले स्थायी समिती अध्यक्ष बनविण्यात येणार हे जवळपास निश्‍चित झाले होते. शिवानी दाणी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३६ मधून निवडून आल्या आहेत.

आज महापौरांच्या अध्यक्षतेखाली रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात मनपाची विशेष सभा पार पडली. यामध्ये पक्षीय व तौलिक संख्याबळानुसार १६ सदस्यांच्या स्थायीवर भाजपचे अकरा, कॉंग्रेस-शिवसेना(उबाठा) प्रणीत नागपूर महाविकास आघाडीचे चार व एमआयएम- इंडियन मुस्लिम लीग प्रणीत मुस्लीम बहुजन विकास आघाडीचा एक सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

budget session 2026 : संत्रा, सिंचन, समृद्धी… बुलढाण्याच्या अपेक्षांना सरकारचा न्याय मिळणार का?

भाजपतर्फे सत्तापक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर व एमआयएम व मुस्लिम लीग प्रणीत मुस्लीम बहुजन विकास आघाडीचे गटनेते अब्दूल करिम अब्दूल गफ्फार पटेल यांनी सदस्यांच्या नावाचे लखोटा महापौरांकडे दिला. महापौरांच्या सुचनेनुसार निगम सचिव रंजना लाडे यांनी सभागृहाला ही नावे वाचून दाखविली. त्यात शिवानी दाणी यांचे नव सर्वप्रथम पुकारण्यात आले. परंपरेनुसार ‘प्रथम’ नाव संबंधित समितीच्या सभापतीचे नाव असते.

समितीवर दाणी यांच्याशिवाय स्वीटी भिसीकर, प्रमिला गौर, विशाखा मोहोड, ममता ठाकूर, साधना बरडे, शितल रारोकर, मानसी सिमले यांचा भाजपने समावेश केला आहे. काँग्रेस-शिवसेना (उबाठा) प्रणीत नागपूर महाविकास आघाडीतर्फे अभिजित झा, अभिषेक शंभरकर, मॅरिस्टेला उसरे तर एमआयएम व मुस्लिम लीग प्रणीत मुस्लीम बहुजन विकास आघाडीतर्फे अस्लम खान यांचा समावेश आहे.

Mehkar Politics : शासकीय समित्यांवर पाठवली मर्जीतील माणसं?

सभेत स्थायीसह अकरा विविध समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये परिवहन समिती सभापतीपदी मंगला खेकरे, स्थापत्य समिती सभापती अश्विनी जिचकार, आरोग्य समिती मनीषा अतकरे, विधी समिती सभापती निधी तेलगोटे, क्रीडा समिती दर्शनी धवड, शिक्षण समिती संतोषदेवी लढ्ढा, गलिच्छ वस्ती ऋतिका मसराम, महिला व बालकल्याण सारिका नांदुरकर, जलप्रदाय दिव्या धुरडे, कर आकारणी सरिता कावरे, अग्निशमन व विद्युत समिती सभापती माया इवनाते यांची नियुक्ती करण्यात आली.