Sunetra pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

sunetra-pawar-elected-ncp-national-president-praful-patel-announcement : प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारणीत अधिकृत घोषणा

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी हात वर करून त्यास सहमती दर्शवली. या घोषणेनंतर पक्षात नव्या नेतृत्वाच्या अध्यायाला अधिकृत सुरुवात झाली आहे.

बैठकीत बोलताना प्रफुल पटेल यांनी माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून दिली. अजित पवार यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या नेतृत्वामुळेच पक्षाला राज्य आणि देशपातळीवर ओळख मिळाली, असे त्यांनी नमूद केले. 2023 मध्ये अजित पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली होती, याची आठवण करून देताना पटेल भावूक झाल्याचे दिसून आले.

Vidarbha Farmers : अकोला जिल्ह्यात ३६ ठिकाणी शिवसेनेचा रास्ता रोको

अजित पवार 28 जानेवारी रोजी आपल्यातून निघून गेल्यानंतर पक्षासमोर नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. उद्या काय करायचे, पक्षाची दिशा काय असणार, असा प्रश्न सर्वांसमोर होता. मात्र सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्ष सक्षमपणे पुढे जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या आदर्शावर चालत पक्षाची वाटचाल सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पक्षातील विविध प्रांतांतील प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde : अजितदादांच्या विमान अपघातानंतर शिंदेंचा मोठा निर्णय

मागील काही महिन्यांपासून पक्षातील घडामोडींवरून बाहेरील व्यक्तींनी भाष्य करण्यास सुरुवात केली होती. पक्षात कोणताही संबंध नसलेले काहीजण सल्ले देत होते, अशी टीकाही पटेल यांनी केली. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना पुढे केले, असे त्यांनी सांगितले.

प्रफुल पटेल यांनी आपल्या 35 वर्षांच्या राजकीय संबंधांचा उल्लेख करत सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा अधिकृत प्रस्ताव मांडला. त्यानंतर सर्वानुमते त्यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

CM Devendra Fadnavis : ‘अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच पुढे जातोय’

या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बदलांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासह देशपातळीवर पक्षाची पुनर्रचना आणि आगामी राजकीय रणनिती याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.