Demand-to-institute-a-state-level-award-in-the-name-of-Ajit-Pawar : आमदार अमोल मिटकरी यांची मागणी, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा
Akola महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अजित पवार यांनी गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या प्रशासनात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या असून, विकासाभिमुख व निर्णयक्षम नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जलसंपदा, वित्त, नियोजन आदी महत्त्वाच्या खात्यांमध्ये त्यांनी केलेले कार्य तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले ठोस निर्णय लक्षात घेता त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, हीच या मागणीमागील भूमिका असल्याचे आमदार मिटकरी यांनी स्पष्ट केले.
Sunetra pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
या प्रस्तावित पुरस्काराच्या माध्यमातून प्रशासन, सहकार, कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करता येईल. असा पुरस्कार भविष्यातील नेतृत्वाला प्रेरणा देणारा ठरेल आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या मूल्यांना अधिक बळकटी देईल, असेही त्यांनी नमूद केले. राज्य शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून “अजितदादा पवार राज्य गौरव पुरस्कार” सुरू करावा, अशी अपेक्षा आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यक्त केली आहे.








