rashtravadi-congress-sunetra-pawar-press-conference-controversy-mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची कुजबूज कॅमेऱ्यात कैद
Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. नव्याने जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची संधी न देता पत्रकार ⁹ परिषद आटोपण्यात आल्याने पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकारातील नेत्यांमधील कुजबूज आणि संभाषण कॅमेऱ्यात कैद झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच काही नेत्यांमध्ये झालेली चर्चा आता व्हायरल झाली आहे. पत्रकारांकडून कठीण किंवा उलटसुलट प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशावेळी प्रश्न न घेता परिषद संपवावी, “मनस्थिती ठीक नाही” असे सांगावे, असे बोलणे ऐकू येत असल्याचा दावा संबंधित व्हिडिओत दिसतो. या पार्श्वभूमीवर आमदार सरोज अहिर यांचाही एक व्हिडिओ समोर आला असून त्यात त्या म्हणताना दिसतात की, “दादा जवळ कधी जाऊ दिलं नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये क्षणभर अस्वस्थता पसरल्याचे जाणवले.
Sunetra pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. सूत्रांच्या मते, सुनेत्रा पवार यांनी आपले लिखित किंवा ठरलेले निवेदन मांडल्यानंतर पत्रकारांकडून प्रश्न विचारले जाण्यापूर्वीच परिषद संपवण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना निघण्यास सांगितल्याचेही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्या निघून गेल्यानंतर काही क्षणांनी पुन्हा काही नेते जागेवर बसल्याचेही दिसून आले. या संपूर्ण घटनेमुळे पक्षाच्या अंतर्गत समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक भाषण केले. त्यांनी सांगितले की, हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्यंत जबाबदारीचा असून लाखो कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. आपल्या लाडक्या नेत्यांच्या अकाली जाण्यामुळे पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पक्ष हा आपला परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.
Youth congress: आमच्या अध्यक्षाच्या केसाला धक्का लावला तर… युवक काँग्रेसचा भाजपला इशारा
या संपूर्ण प्रकरणामुळे नव्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत आणि पक्षातील समन्वयाबाबत चर्चांना वेग आला आहे. पत्रकार परिषद आटोपण्याच्या पद्धतीवरून विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात सुनेत्रा पवार या माध्यमांसमोर सविस्तर भूमिका मांडतात का आणि पक्षातील अस्वस्थता कशी हाताळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








