Akola Municipal Corporation : टिपू सुलतान नामफलक हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक

Shivsena-demand-to-remove-the-nameplate-of-Tipu-Sultan : अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेरील फलक हटविण्याची मागणी

Tipu-Sultan

Akola अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाला असलेला टिपू सुलतान यांचा नामफलक हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात मागील दहा दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन नामफलक हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही अथवा लिखित उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, काल विधानभवनात मुख्यमंत्री यांनी ऐतिहासिक संदर्भ मांडताना टिपू सुलतान यांच्या कार्यकाळातील घटनांचा उल्लेख केला. अशा पार्श्वभूमीवर महापालिकेत त्यांच्या नावाचा उल्लेख असणे अयोग्य असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले.

Farmers’ Economic Council : शेतकरी अर्थ परिषदेतून शेतकरी, शेतमजुरांची होणार एकजूट!

यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, संघटक तरुण बगेरे, युवासेना जिल्हाप्रमुख अतुल एडणे, जिल्हाप्रमुख युवासेना विक्की बावरी, शहरप्रमुख युवासेना योगेश ढोरे, माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने महापालिका परिसरात जमा झाले होते.

दोन्ही बाजूंनी जमाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिस प्रशासनाने बंदोबस्त वाढविला. यावेळी महापालिका आयुक्तांनी येत्या आठ दिवसांत याबाबत कोणती कारवाई करण्यात येणार, याची माहिती लेखी स्वरूपात दिली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ‘नामफलक हटवा’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

Sarpanch administrator : मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका!

दरम्यान, प्रशासनाने आठ दिवसांत नामफलक हटवून त्या ठिकाणी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या राष्ट्रहिताच्या व्यक्तींचे नाव देण्यास हरकत नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. मात्र, मागणी मान्य न झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने नामफलक काढेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही शिवसेनेने स्पष्ट केले.