mla-sanjay-kute-warns-party-workers-for-personel-interest-contracts : ‘वैयक्तिक फायद्याचे कंत्राट नको, समस्या सोडवा’, संघटनात्मक बैठकीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या
Buldhana जळगाव जामोद मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या एका मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या ठेकेदारीच्या प्रवृत्तीवर बोट ठेवत, वैयक्तिक फायद्याच्या कामांपेक्षा जनहिताची कामे प्राधान्याने आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठेकेदारीमुळे संघटनेत निर्माण होणारे मतभेद आणि आर्थिक जोखमीबाबत कार्यकर्त्यांना सावध करण्यात आले असून, जनहिताचा अजेंडा अधिक ठळक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बैठकीत कार्यकर्त्यांना सावध करत, “उठसूट ठेके घेऊ नका. ठेकेदारी सोपी नसते, यात वैयक्तिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते,” असे स्पष्ट करण्यात आले. एकाला ठेका दिल्यास इतर कार्यकर्ते नाराज होतात, ज्यामुळे संघटनेत मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सार्वजनिक हिताची कामे आणली तरच त्याला प्राधान्य दिले जाईल, असे ठामपणे नमूद करण्यात आले.
Akola Municipal Corporation : घाईघाईत 400 कोटींचे कंत्राट देण्यावरून आयुक्त अडचणीत
एखाद्याची वैयक्तिक कामे केल्यास इतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढते. त्यामुळे वैयक्तिक आग्रह धरण्यापेक्षा गावातील आणि मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले. या स्पष्ट भूमिकेमुळे आगामी काळात संघटनात्मक कामकाजात शिस्त येण्याची शक्यता आहे.








