Akola municipal coperation : अतिक्रमण व पुररेषा ओलांडून बांधकामाचा मुद्दा; स्वीकृत सदस्य नियुक्तीवरून वाद

akola-municipal-coperation-nominated-member-dispute-sunil-innani-morna-river-encroachment : भाजपचा अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून विरोध; वंचित बहुजन आघाडीकडून आरोपांचे खंडन

Akola अकोला महापालिकेतील ८० सदस्यांच्या प्रमाणात आठ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून आता तांत्रिक वाद निर्माण होऊ लागला आहे. वंचित बहुजन आघाडीने शहरातील नामांकित बिल्डर सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिल्याने या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला. भाजपचे गटनेते पवन महल्ले यांनी शहरातील अतिक्रमित जागांवर तसेच मोर्णा नदीच्या पुररेषा ओलांडून बांधकाम केल्याच्या आरोपांशी संबंधित व्यक्तीला स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती देता येते का, असा प्रश्न उपस्थित केला.

Rajya sabha election : सातही उमेदवारांची निवड निश्चित, राज्यसभा निवडणूक बिनविरोध!

यावर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. इन्नानी यांच्यावर कोणतेही अधिकृत आरोप नसताना त्यांना आरोपी ठरवत स्वीकृत सदस्यपदाला विरोध केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर मोर्णा नदीच्या पुररेषेतील अतिक्रमण त्यांनी केले नसल्यास त्यासाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होताच सभागृहात काही काळ वाद निर्माण झाला.

या तांत्रिक मुद्यावर सभागृहात कोणताही ठोस तोडगा निघाला नसला तरी अखेरीस सुनील इन्नानी यांची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती कायम ठेवण्यात आली.

Katol blast : आणखी तीन महिलांनी घेतला अखेरचा श्वास, स्फोटाच्या वेदनांमध्ये होरपळताहेत कुटुंब

सुनील इन्नानी यांच्या स्वीकृत सदस्यपदावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुररेषा ओलांडून करण्यात आलेल्या बांधकामांची चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका माजी नगरसेवकाने या प्रकरणावर भाष्य करताना शहरातील अवैध बांधकामांना राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा आरोप केला. काही बांधकाम व्यावसायिकांना सभागृहात स्थान मिळावे यासाठीच स्वीकृत सदस्यपदे दिली जात असल्याचीही टीका त्यांनी केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सत्ताधारी पक्ष किंवा महापालिका प्रशासनाकडून होणार का, याकडे लक्ष लागले आहे.