APMC : संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिवर्तन पॅनलचा झेंडा

parivartan-panel-won-sangrampur-apmc-elections : सभापतीपदी प्रदीप बडोदे, उपसभापतीपदी उमेश टावरी अविरोध

Sangrampur संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे प्रदीप बडोदे यांची सभापतीपदी, तर उमेश टावरी यांची उपसभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. विरोधी गटाकडून कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

बाजार समितीवर परिवर्तन पॅनलचे तब्बल १३ संचालक असल्याने समितीवरील सत्ता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे, तर विरोधी गटाकडे केवळ पाच संचालक आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल पूर्वनियोजित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

NCP Sharad pawar : ‘शासनाची कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांची दिशाभूल’, शरद पवार गटाचा आरोप

आज झालेल्या विशेष सभेला एकूण १७ संचालक उपस्थित होते. बहुमत असलेल्या परिवर्तन पॅनलकडून प्रदीप बडोदे आणि उमेश टावरी यांचे नामांकन अर्ज सादर करण्यात आल्यानंतर प्राधिकृत अधिकारी जी. जे. आमले यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी बुलढाणा बाजार समितीचे सचिव पंकज मारोडे उपस्थित होते.

या सभेला संचालक शांताराम दाणे, सुरेश तायडे, भाऊराव अवचार, संतोष राजनकर, राजेंद्र ठाकरे, रमेश फाळके, रवींद्र झाडोकार, चित्राबाई मुयांडे, कुसुमबाई वखारे, श्रीकृष्ण बोरसे, अभयसिंह मारोडे, रवींद्र रावणकर, राजेंद्र वानखडे, शेख सलीम शेख, मोही बुलहक, संजीव इंगळे आदी संचालक उपस्थित होते. संचालक श्रीकांत मारोडे अनुपस्थित होते.

Budget session 2026 : नोकरभरतीतील परीक्षा शुल्कात ५० टक्के कपातीची मागणी; विधानसभेत आमदारांनी वेधले सरकारचे लक्ष

यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विश्वासराव वरणकार, तेजराव मारोडे, प्रा. रमेश राजनकर, उद्धवराव व्यवहारे, राहुल शिरसोले यांच्यासह परिवर्तन पॅनलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.