mla-siddharth-kharat-hoping-hands-for-mehker-development : आमदार खरात यांच्या विधानावर मेहकरमध्ये राजकीय चर्चा
Mehkar मेहकर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आमदार सिद्धार्थ खरात यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेले वक्तव्य सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शहराचा विकास आणि परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले; मात्र त्यांच्या या विधानानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
कार्यक्रमात बोलताना आमदार खरात यांनी, “मेहकर शहर बदलायचे असेल आणि विकासाला गती द्यायची असेल, तर ते काम एकट्याने शक्य नाही. त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांची एकत्रित साथ आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
APMC : संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिवर्तन पॅनलचा झेंडा
दरम्यान, आमदारांच्या या वक्तव्यावर नागरिकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की, मेहकरच्या विकासासाठीच मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठवले आहे. “आमच्या पाठिंब्यामुळेच आपण आमदार झालात; त्यामुळे शहराच्या विकासासाठी पुढाकार घेऊन ठोस दिशा देण्याची जबाबदारीही आपलीच आहे,” अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.
मेहकर शहरात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सोयीसुविधांच्या प्रश्नांवर नागरिकांकडून सातत्याने मागण्या होत आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून बदल दिसावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
NCP Sharad pawar : ‘शासनाची कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांची दिशाभूल’, शरद पवार गटाचा आरोप
‘आता सगळ्यांची साथ हवी’ या आमदारांच्या आवाहनानंतर शहराच्या विकासाला खरोखरच गती मिळणार का, की हा मुद्दा केवळ भाषणांपुरताच मर्यादित राहणार, याकडे आता मेहकरकरांचे लक्ष लागले आहे. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय कितपत साधला जातो, यावरच पुढील राजकीय आणि विकासाची दिशा अवलंबून राहणार असल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे.








