Vidhan bhavan nagpur : आमदारांची संख्या ४०० होणार की फक्त खुर्च्या वाढणार?

number-of-MLAs-rise-to-400-or-will-only-the-chairs-increase? : नागपूरच्या विधानभवनाचा मास्टर प्लान तयार

Nagpur नागपूरचे विधानभवन आता नव्या स्वरूपात साकारले जाणार आहे. यासाठी इमारतीच्या मागच्या बाजूची जागा अधिग्रहित करण्यात आली आहे. मुख्य संकुलासाठी ६६२ कोटी आणि प्रशासकीय इमारतीसाठी ३३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. नवीन विधानभवनातील विधानसभा सभागृहाची आसन क्षमता ४००, तर विधान परिषद सभागृहाची क्षमता १२० इतकी राहणार आहे. यामुळे भविष्यात आमदारांची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

२०२९ मध्ये देशभरातील मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यानुसार विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात भविष्यात तीन लोकसभा मतदारसंघ होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

याशिवाय, लोकसंख्येनुसार नागपूर शहरात दोन आणि ग्रामीण भागात दोन असे नवे चार विधानसभा मतदारसंघ तयार होऊ शकतात. हे पाहता नागपूर जिल्ह्यातील आमदारांची संख्या १२ वरून १६ वर पोहोचेल. राज्यभरातच पुनर्रचना होणार असल्याने एकूणच आमदारांच्या संख्येत वाढ होणार आहे. नागपूरच्या विधानभवनाचा विस्तार याच गरजेनुसार केला जात असल्याचे समजते.

Missing women : राज्यात बेपत्ता होणाऱ्या महिला-मुलींची वाढती संख्या चिंतेचा विषय

नवीन विधानभवनाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा, विधान परिषद, मध्यवर्ती सभागृह आणि स्वतंत्र प्रशासकीय इमारतीची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.