Vipin Itankar : कोण म्हणतं सिलिंडरची टंचाई आहे, एकही हॉटेल बंद पडले नाही

nagpur-collector-claims-there-is-no-shortage-of-cylinder-in-nagpur : जिल्हाधिकारी इटनकर यांचा दावा, टंचाईची फक्त अफवाच

Nagpur अमेरिका आणि इराणच्या युद्धाची भारताला झळ बसत आहे. सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक चहाच्या टपऱ्या बंद पडल्या आहेत. काही मोठे हॉट्लसचे किचन बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शहरांमध्ये सिलिंडरसाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र नागपूरमध्ये सिलिंडरची अजिबात टंचाई नाही, एकही हॉटेल बंद पडले नाही असा दावा नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केला आहे.

सिलिंडरची टंचाई आहे ही फक्त अफवा आहे. अनावश्यक भीती निर्माण केली जात आहे. मी आजच आढावा घेतला. एकानेही सिलिंडर मिळाले नाही अशी तक्रार केलेली नाही. शहरातील एकही हॉटेल बंद पडले नाही. उलट चार ते पाच दिवस पुरेल एवढा सिलिंडरचा साठा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. फक्त रेशनिंग केले जात आहे. घरगुती सिलिंडरीच टंचाई होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी केवायसी अपडेड करण्यास सर्वांना सांगण्यात आले आहे. युद्धाची परिस्थिती बघता सिलिंडरचे रेशनिंग केले जात आहे.

Nagpur Municipal corporation : आयुक्तांचे करवाढीचे संकेत, निर्णय टाकला स्थायी समितीच्या कोर्टात

यासाठी एक सिलिंडर घेतल्यानंतर २५ दिवस दुसऱ्या सिलिंडरसाठी बुकिंग घेतल्या जात नाही. हे करणे आवश्यक आहे. अन्यथा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी दावा केला असला तरी त्याच्या उलट परिस्थिती शहरात आहे. व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने व्हीसीए क्लबचे किचन बंद करण्यात आले आहे. गॅस एजंसीसमोर लोकांच्या रांगा लागल्या आहे. गॅस एजंसीतून ग्राहकांचे फोन उचलल्या जात नाही.