Maha DBT : महाडीबीटीचा फुगा फुटला! पूर्वसंमती बंद, शेतकऱ्यांची थट्टा

1101-farmers-in-sangrampur-deprived-of-subsidy-maha-DBT : संग्रामपूर तालुक्यातील ११०१ शेतकरी अनुदानापासून वंचित

Sangrampur “अडला हरी, शासनाचे पाय धरी” अशी दयनीय अवस्था सध्या संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. कृषी योजनांच्या अनुदानाचे गाजर दाखवत शासनाने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज घ्यायचे, मंजुरीचे संदेश पाठवायचे; मात्र अंतिम टप्प्यावर ‘पूर्वसंमती’चा पर्यायच बंद ठेवून शेतकऱ्यांची थट्टा उडवली जात असल्याचा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.

महाडीबीटी अंतर्गत वैयक्तिक कृषी योजनांसाठी तालुक्यातील तब्बल १२ हजार ३३३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी अनेकांना मंजुरीचे मोबाईल एसएमएसही प्राप्त झाले. मात्र पुढील प्रक्रिया थांबल्याने हे सर्व अर्ज अक्षरशः अडकून पडले आहेत.

Donald trump : “मोजतबा खामेनी जिवंत नसल्याचं ऐकलंय”; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

फळबाग योजनेअंतर्गत १६८ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून पात्रता मिळवली. ठिबक व तुषार सिंचनासाठी ३६५६ अर्ज मंजूर झाले असून त्यापैकी ६२६ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत रोटाव्हेटर, ट्रॅक्टर व इतर उपकरणांसाठी ७८०० अर्ज मंजूर झाले असून ३०७ शेतकरी पूर्वसंमतीसाठी पात्र ठरले आहेत.

मात्र या सर्व प्रक्रियेला अचानक ब्रेक लागला आहे. महाडीबीटी पोर्टलवरील ‘Pre-Sanction’ म्हणजेच पूर्वसंमतीचा टॅबच बंद असल्याने अर्ज अंतिम टप्प्यावर थांबले आहेत. परिणामी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ११०१ शेतकऱ्यांचे अनुदान अर्ज प्रलंबित राहिले असून शेतकरी हताश झाले आहेत.

शेतकरी दररोज कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून “पोर्टल पुण्याहून बंद आहे” असे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्याऐवजी पोर्टलच्या तांत्रिक कारणांमुळे योजनांचा फुगा फुटल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Dada Bhuse : पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या शिक्षक नियुक्त्यांना मान्यता नाही

महाडीबीटी पोर्टलवरील हा गोंधळ तातडीने दूर करून पूर्वसंमती प्रक्रिया सुरू करावी आणि अडकलेले अर्ज मार्गी लावावेत, अशी जोरदार शेतकरी देत आहेत.