Farande Vs Jadhav : विधानसभेत ‘हायव्होल्टेज’ ड्रामा, भास्कर जाधवांना “जय श्रीराम बोला”चा आग्रह

maharashtra-assembly-bhaskar-jadhav-devyani-farande-controversy-rahul-narvekar-reaction : अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अखेर देवयानी फरांदे यांना सुनावले

Mumbai : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधी बाकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव मनरेगा योजनेतील मजुरांच्या थकीत वेतनाच्या मुद्द्यावर आक्रमक भाषण करत असताना भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्या भाषणात हस्तक्षेप केल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

भास्कर जाधव यांनी मनरेगा योजनेअंतर्गत मजुरांचे चार-चार वर्षे थकीत असलेले पैसे का दिले जात नाहीत, असा सवाल उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. भाषणादरम्यान त्यांनी ‘जीआर’चा उल्लेख करत मिश्किल शैलीत “तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का?” अशी टिप्पणी केली. या वक्तव्यानंतर सत्ताधारी बाकांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

Drone attack threat: कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रे उडवून देण्याची धमकी; परिसरात हायअलर्ट

यावर संतप्त झालेल्या देवयानी फरांदे यांनी पहिल्या बाकावर येऊन बसत जाधव यांना “जय श्रीराम बोला” असा आग्रह धरला. त्यांनी वारंवार हस्तक्षेप करत भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे काही काळ सभागृहात गदारोळ निर्माण झाला.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत देवयानी फरांदे यांना कडक शब्दात सुनावले. “तुम्ही पहिल्या रांगेत येऊन बसलात म्हणजे तुम्हाला त्या रांगेचे अधिकार मिळत नाहीत. कृपया आपल्या जागेवर जाऊन बसा,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अध्यक्षांच्या सूचनेनंतर भास्कर जाधव यांनीही पलटवार करत “तुमच्याकडून शिक्षण घेण्याची माझी प्राज्ञा नाही,” असा टोला लगावला. यानंतर विरोधकांनी मजुरांच्या प्रश्नावर सरकार समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करत सभागृहातून वॉकआउट केला.

Big blow to UBT : अकोल्यात शिवसेनेत मोठी फूट; उद्धव गटाचे पाच नगरसेवक शिंदे गटात

या गोंधळानंतर संबंधित मंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्याचे सांगितले आणि येत्या एका महिन्यात सर्व मजुरांची देणी दिली जातील, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे विधानसभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.