व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mohan Bhagwat: संघासाठी अनुकूल काळ, परंतु बाधा टाळण्यासाठी ‘व्हॅक्सिनेशन’ची गरज, सरसंघाचालक डॉ....

Mohan Bhagwat: संघासाठी अनुकूल काळ, परंतु बाधा टाळण्यासाठी ‘व्हॅक्सिनेशन’ची गरज, सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत

Favourable-days-for-Rss-still-challenging-dr-mohan-bhagwat : ‘माझ्या विधानांचा संदर्भ सोडून गदारोळ केला जातो, तेव्हा मला दया येते’

Nagpur पूर्वी देशाचे स्वातंत्र्य आणि मुस्लिमांचे हल्ले हे मुख्य विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर होते. आता काळ बदलला आहे. आज संघ सर्वत्र आहे, ही अनुकूलता आहे. पण अनुकूलतेची बाधा होऊ नये, यासाठी स्वयंसेवकांनी शिस्त आणि संस्कारांचे व्हॅक्सिनेशन घेणे गरजेचे आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे, कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांनीही आम्ही संघाचे विरोधक असलो तरी संघ चांगला आहे, अशी पावती हीसुद्धा संघासाठी एकप्रकारची अनुकूलताच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
संघाच्या कार्यपद्धतीचा पोलादी साचा तोच राहणार असला, तरी बाह्य रूपात आता काळानुसार ‘अपडेट्स’ दिसणार आहेत. वाढत्या अपेक्षा आणि अवाढव्य विस्तार पेलण्यासाठी संघ आता ‘विकेंद्रीकरणा’च्या वाटेवर असून, हायराईज सोसायट्यांपासून ते ‘झेन-जी’ पिढीपर्यंत पोहचण्यासाठी संघाने कंबर कसली आहे.

Mohan bhagwat : “दोन माणसांचे भेटणे थांबत नाही, तोपर्यंत संघ बंद होणार नाही”

संघाचे काम आता प्रचंड वाढले आहे. जेव्हा एखादी चळवळ किंवा संस्था मोठी होते, तेव्हा तिचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी विकेंद्रीकरण आवश्यक असते. त्यादृष्टीने आता ‘संभाग’ रचना करण्यात आली आहे. यामुळे कामात सुटसुटीतपणा येईल आणि शेवटच्या स्वयंसेवकापर्यंत पोहोचणे सोपे होईल. असे असले तरी संघाची मूळ कार्यपद्धती मैत्री आणि वैयक्तिक संपर्क हीच आहे आणि ती कधीही बदलणार नाही. दुसरी कोणतीही पद्धत आम्हाला सापडलेली नाही. ही पद्धत रटाळ वाटू शकते, पण तीच मूलभूत आहे. माझ्या विधानांचा संदर्भ सोडून गदारोळ केला जातो, तेव्हा मला दया येते आणि हसूही येते. टीकेमुळे आम्ही काय बोलले पाहिजे याचे आमचे शिक्षणच होते, असे सकारात्मक मत त्यांनी मांडले. प्रतिकूल काळातही संघ केवळ कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांचया कळकळीमुळे वाढला, प्रसिद्धीमुळे नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले.

Ashok kharat case : “रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा”५८ व्हिडिओंनी वाढली खळबळ !

फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या माध्यमांवर स्वयंसेवकांनी लिहिताना विवेक पाळला पाहिजे. तंत्रज्ञान कोणीही रोखू शकत नाही, पण त्याचा वापर शिस्त पाळूनच झाला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या चुकांमुळे संघाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी प्रशिक्षणावर भर दिला जात आहे असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तरुण भारत’ दैनिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघाचालकांची प्रगट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र देशपांडे आणि संपादक शैलेश पांडे यांनी घेतली.

error: Content is protected !!