Epstein files : मोदींचे नाव ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये? काँग्रेस-वंचित थेट संघ मुख्यालयावर धडकणार

Congress, vanchit aaghadi to protest at RSS headquarter reahimbagh Nagpur : सोमवार, 23 मार्चला मोर्चा, भारताची नाचक्की होत असल्याचा निषेध

Nagpur अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या खळबळजनक ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा करत, आता महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरून मोदींच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोमवार, २३ मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षांच्या वतीने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानंतरही नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर कसे कायम आहेत? असा सवाल विरोधकांनी केला आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Education office : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात अनागोंदीचा कळस

अमेरिकेशी केलेल्या व्यापारी करारांमुळे भारतीय शेतकरी देशोधडीला लागणार असून, मोदींनी देशाचा स्वाभिमान गहाण ठेवल्याची टीका संयुक्त मोर्चाने केली आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसने या गंभीर प्रकरणात अद्याप मौन का बाळगले आहे आणि मोदींना पदावरून का हटवले नाही, याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा थेट संघ मुख्यालयावर धडकणार आहे. मोदी आणि भाजपला निवडून आणण्यासाठी संघ व स्वयंसेवकांनी निवडणुकीत काम केले होते.

Mehkar Municipal Council : शासकीय जमिनीचा वापर बदलला; मेहकर नगरपरिषदेला १.७३ कोटींचा दंड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी संघामुळे आम्ही निवडून आलो असल्याचा दावा केला आहे. सोबतच संघ कार्याची प्रशंसासुद्धा केली आहे. संघ सातत्याने नैतिकता आणि चारित्र्यावर आमच भर असल्याचे सांगत असोत. त्यामुळे काँग्रेसने याचा जाब संघालाच विचारण्याचे ठरवले आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा हा संयुक्त मोर्चा नागपुरातील ऐतिहासिक संविधान चौक ते रेशीमबाग (संघ मुख्यालय) दरम्यान काढला जाईल.

Sharad pawar : राज्यसभा निवडीनंतर शरद पवारांची ‘डिनर डिप्लोमसी’

भाजपाचा ‘चाल, चलन आणि चेहरा’ आता उघडा पडला आहे. भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या पंतप्रधानांना संघाने पाठीशी का घातले आहे, हे स्पष्ट व्हायला हवे, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मांडली आहे. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आहेत. या मोर्चात काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.