Income growth slows in Buldhana : विकासाचा फक्त ‘भास’; आकडे वाढले, खिसा रिकामाच; बुलढाण्यात उत्पन्नवाढीचा वेग मंद
Buldhana राज्याच्या ताज्या आर्थिक पाहणी अहवालाने बुलढाणा जिल्ह्याच्या अर्थकारणातील विसंगती पुन्हा अधोरेखित केली आहे. दरडोई उत्पन्न १ लाख ३७ हजार रुपयांच्या पुढे गेल्याचा दावा आकडेवारीत दिसत असला, तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिकांच्या हातात दररोज केवळ ३७५ ते ३८० रुपयेच येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ‘वाढत्या उत्पन्ना’च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात केवळ १० हजार १३० रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ कागदोपत्री समाधानकारक वाटत असली, तरी महागाई, वाढते खर्च आणि मर्यादित रोजगाराच्या संधी यामुळे सामान्यांच्या जीवनमानात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. विशेषतः कृषीप्रधान असलेल्या जिल्ह्यात औद्योगिक विकासाचा वेग अद्याप मंदावलेलाच असल्याने अर्थव्यवस्था एकाच क्षेत्रावर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते.
Vidarbha farmers : धान्य बंद, पैसेही थकले; चिखलीत शेतकऱ्यांचा संताप उसळला
ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्याची वार्षिक उलाढाल सुमारे ३८ हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून, निव्वळ उत्पन्न ३८ हजार ७५१ कोटी रुपये इतके नोंदवले गेले आहे. यामध्ये कृषी क्षेत्राचा तब्बल ७,४८६ कोटी रुपयांचा वाटा असून, जिल्ह्याची अर्थव्यवस्था अजूनही शेतीभोवतीच फिरत असल्याचे दिसून येते.
गेल्या पाच वर्षांत दरडोई उत्पन्नात ४४ हजार ६७१ रुपयांची वाढ झाली असली, तरी या वाढीचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत कितपत पोहोचला, हा प्रश्न कायम आहे. लोकसंख्या वाढ, मर्यादित उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधींचा अभाव यामुळे उत्पन्नवाढीचा परिणाम प्रत्यक्ष जीवनात दिसून येत नाही.
Harshwardhan Sapkal : मोदी आता तुमचे ऐकत नाही का?, सपकाळ यांचा सरसंघचालकांना सवाल
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, ही आकडेवारी शासनाच्या विकासाच्या दाव्यांवरच प्रश्न उपस्थित करते. ‘कागदावरची प्रगती’ आणि ‘जमिनीवरील वास्तव’ यामधील दरी भरून काढण्यासाठी ठोस धोरणांची गरज अधोरेखित होत आहे. अन्यथा, वाढत्या आकड्यांमागे लपलेली आर्थिक तंगी हीच बुलढाण्याची खरी ओळख ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








