Operation Lotus : साताऱ्याचा धडा; बुलढाण्यात ‘ऑपरेशन लोटस’मध्ये अडथळा की पुनरावृत्ती?

Obstacle to or repeat of ‘Operation Lotus’ in Buldhana : होमग्राऊंडवर धक्का, बुलढाण्यात पुनरागमनाची लढत तीव्र

Buldhana साताऱ्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून, त्याचे पडसाद आता बुलढाण्यात उमटताना दिसत आहेत. ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून भाजपने महायुतीतीलच समीकरणे बदलत सत्ता हस्तगत केली, तर स्थानिक पातळीवर महायुतीतील घटक पक्षांना मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले.

या संपूर्ण घडामोडीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आपल्या साताऱ्यातील ‘होमग्राऊंड’वर राष्ट्रवादी (अजित पवार गट) बळकट करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. शिंदेसेनेची साथ असतानाही अंतिम टप्प्यात सत्ता हातातून निसटल्याने राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Per capita income : दरडोई उत्पन्न १.३७ लाख, पण दिवसाला फक्त ३८० रुपये

दरम्यान, बुलढाणा जिल्हा परिषद निवडणुका अद्याप प्रलंबित असून, भाजपने येथे सत्ता मिळवण्याचे लक्ष्य निश्चित केल्याची चर्चा रंगत आहे. यासाठी विविध पातळ्यांवर रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात असले, तरी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने सर्वच राजकीय पक्ष सावध भूमिकेत आहेत.

साताऱ्यातील अनुभवामुळे आता बुलढाण्यातील समीकरणांकडे अधिक बारकाईने पाहिले जात आहे. येथे सामाजिक, राजकीय आणि स्थानिक स्तरावरील गटबाजी वेगळी असल्याने, तिथल्या सूत्रांचा थेट परिणाम येथे होईलच असे नाही. त्यामुळे ‘रिहर्सल’ साताऱ्यात झाली असली, तरी बुलढाण्यातील ‘मॅच’ अधिक कठीण ठरणार, अशी राजकीय जाणकारांची धारणा आहे.

Ajit Pawar death : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार अमोल मिटकरी यांचे आंदोलन

याच पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांकडून संभाव्य ‘ऑपरेशन लोटस’ रोखण्यासाठी आतापासूनच ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवणे, स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करणे आणि मतदारांशी संपर्क वाढवणे यावर भर दिला जात आहे. एकूणच, साताऱ्याचा धडा लक्षात घेता बुलढाण्यातील आगामी राजकीय लढत अधिकच चुरशीची ठरणार असून, अखेर बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.