Eknath Shinde Shivsena : दिल्ली बैठकीनंतर जिल्ह्यात खळबळ; गटबाजी, नाराजी आणि सूचक हालचाली

eknath shinde delhi visit creates new political equations in district : शिंदेसेनेत अंतर्गत हालचालींना वेग; जिल्हा पातळीवर राजकीय समीकरणे बदलणार

Buldhana शिंदेसेनेत सध्या जिल्हा पातळीवर अंतर्गत हालचालींना वेग आला असून, विविध घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत निवडक नेत्यांची बैठक घेतल्यानंतर या हालचालींना अधिक गती मिळाल्याचे चित्र आहे.

परिसीमन आयोग अद्याप स्थापन झालेला नसला, तरी आगामी जनगणनेनंतर त्याची स्थापना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने विविध गट सक्रिय झाले असून, स्थानिक स्तरावर सूचक हालचाली सुरू आहेत.

Ram Navmi celebration : रामनवमीच्या ६२ मिरवणुका, २३५० पोलिस तैनात

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे सार्वजनिकरीत्या संयमी भूमिका घेत असल्याचे दिसत असले, तरी त्यांच्या निकटवर्तीयांकडून सिंदखेडराजा तालुक्यात हस्तक्षेप होत असल्याच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पक्षांतर्गत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सिंदखेडराजा परिसरात एका माजी आमदारांच्या नावाने समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या पोस्ट्सनेही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पोस्ट्स संबंधित कार्यकर्त्यांकडूनच तयार केल्या जात असल्याची चर्चा असून, त्यातून गटबाजीचे संकेत मिळत आहेत.

Buldhana Politics : ‘३५ कोटी’वरून बुलढाण्यात राजकारण पेटले; गायकवाड-सपकाळ आमनेसामने

दुसरीकडे, संजय गायकवाड यांच्या अलीकडील वक्तव्यांनी आधीच चर्चेला उधाण आले असताना, मेहकर तालुक्यात माजी आमदारांच्या समर्थकांकडून उद्धवसेनेच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे समोर येत आहे. या घडामोडींमुळे पक्षांतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र आहे. एकूणच, शिंदेसेनेत जिल्हा स्तरावर गटबाजी, नाराजी आणि राजकीय पुनर्रचनेचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता असून, पक्षातील अंतर्गत समीकरणे नेमकी कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.