Amar kale clarifies, he does not received any proposal or call, operation tutari is rumor : खासदार अमर काळेंचे स्पष्टीकरण, शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर वाढल्या चर्चा
Nagpur महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि ‘ऑपरेशन तुतारी’ची जोरदार चर्चा रंगली असतानाच, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार अमर काळे यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. मला अद्याप कोणीही संपर्क केलेला नाही आणि असा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, हे सर्व दावे निव्वळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण खासदार काळे यांनी दिले आहे.
राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (शिंदे गट) उद्धव ठाकरे गटाचे (टायगर) आणि शरद पवार गटाचे (तुतारी) खासदार आपल्या गोटात खेचण्यासाठी सक्रिय असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आले. दिल्लीतील आपले स्थान अधिक मजबूत करणे आणि केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्या मंत्र्यांची संख्या वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
https://sattavedh.com/ashok-kharat-case-chandrashekhar-bawankule-challanges-vijay-wadettiwar-to-provide-eviden
‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू होताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदार आणि आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेवरील दावा सोडून शरद पवार यांना समर्थन देण्याच्या निर्णयावर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. एकनाथ शिंदे आम्हाला मदत करतात, असे विधान काही नेत्यांनी केल्याने या मोहिमेला बळ मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर लगेचच ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली. या सर्व घडामोडींवर खासदार अमर काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अनेक लोक मला या संदर्भात विचारत आहेत, मात्र मला शिंदे गटाकडून कोणताही संपर्क किंवा प्रस्ताव आलेला नाही.
Buldhana Politics : खामगावातील स्थानिक वाद, महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, एकत्रीकरणाची चर्चा केवळ माध्यमांमध्येच ऐकायला मिळत आहे, पक्ष स्तरावर अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. या विषयावर माझे कोणतेही व्यक्तिगत मत नसून, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वस्वी शरद पवार साहेबच घेतील. या संपूर्ण प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, प्रत्यक्षात एखादा मोठा भूकंप होतो की या केवळ चर्चाच ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








