व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sansad March Violent : दिल्लीतील ‘संसद मार्च’ हिंसक; ७८ आंदोलक ताब्यात

Sansad March Violent : दिल्लीतील ‘संसद मार्च’ हिंसक; ७८ आंदोलक ताब्यात

delhi-sansad-march-turned-violent-118-policemen-injured-78-protesters-detained : वाहनांची मोठी तोडफोड, ११८ पोलीस जखमी

Delhi: भारताची राजधानी दिल्ली येथे सोमवारी झालेल्या ‘संसद मार्च’ आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राजधानीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षात ११८ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय सुमारे ६० आंदोलकही जखमी झाले असून, अनेक सरकारी आणि खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ७८ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने जंतर-मंतर येथून संसदेकडे मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने पोलिसांनी आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती काही वेळातच नियंत्रणाबाहेर गेली.

Ashish Jaiswal : विरोधक हताश झाल्याने गँग बनवून समाजात असंतोष निर्माण करताहेत; आशिष जयस्वाल यांचा घणाघात

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली तसेच सरकारी वाहनांची आणि सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या संघर्षात अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंसाचारानंतर राजधानीतील अनेक भागांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. संवेदनशील परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओंच्या आधारे हिंसाचारात सहभागी झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता का किंवा त्यामागे कोणते षडयंत्र होते का, याचाही तपास केला जाणार आहे. विविध भागांतून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांच्या लाठीचार्जवरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. आंदोलकांवर अनावश्यक बळाचा वापर केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Chandrashekhar bawankule : सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता का?

दुसरीकडे, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने मंगळवारीही आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजधानीत पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!