व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील ३५० आंदोलक ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील ३५० आंदोलक ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

chaityabhumi-protest-permission-denied-350-protesters-detained-fir-process-begins : आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही जंगला जमाव

Mumbai: मुंबईतील ऐतिहासिक चैत्यभूमी परिसरात आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही जमलेल्या आंदोलनकर्त्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) आणि कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) समर्थकांनी सोमवारी चैत्यभूमी परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने पूर्वपरवानगी नाकारल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी आंदोलन रोखत सुमारे ३०० ते ३५० आंदोलकांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आता संबंधितांवर गुन्हा दाखल (एफआयआर) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैत्यभूमी हे संवेदनशील ठिकाण असल्याने येथे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलकांना आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि विद्यार्थी परिसरात जमल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कारवाई केली.

ताब्यात घेतलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक : आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या ३०० ते ३५० जणांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर काही काळ चैत्यभूमी आणि दादर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

Delhi Lathicharge : सुप्रिया सुळे, अण्णा हजारे आणि एम्स डॉक्टर संघटना आक्रमक

शिवाजी पार्क पोलिसांकडून एफआयआरची प्रक्रिया : मध्य प्रादेशिक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधित आंदोलनकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहितेतील लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू : दरम्यान, विविध संघटनांकडून आंदोलनाची हाक देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात २३ जुलैपासून ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत १५ दिवस जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून, सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Sansad March Violent : दिल्लीतील ‘संसद मार्च’ हिंसक; ७८ आंदोलक ताब्यात

राज्यातील इतर शहरांतही आंदोलन : मुंबईप्रमाणेच नवी मुंबई, वाशी, ठाणे, अंबरनाथ आणि भिवंडी येथेही विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शने केली. या सर्व ठिकाणी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मुंबईतील कारवाईनंतर राज्यभरातील आंदोलनांबाबत पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून, परवानगीशिवाय आंदोलन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

error: Content is protected !!