new dates to file income tax return in new financial year : टॅक्स भरण्याच्या तारखांत बदल, इनकम टॅक्स भरण्याच्या व्यवस्थेत बदल
Mumbai जर तुम्हीही इनकम टॅक्स भरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण १ एप्रिल २०२६ पासून म्हणजेच आजपासून देशातील कर प्रणालीत मोठे बदल लागू झाले आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. कर भरण्याची प्रक्रिया सोपी करणे हा यामागचा उद्देश असला तरी या बदलांमुळे तुमचा खर्चदेखील वाढण्याची शक्यता आहे. हे बदल नेमके काय आहेत? पाच मुद्द्यांतून समजून घेऊ या..
१९६१ पासून लागू असलेला जुना आयकर कायदा इतिहासजमा झाला असून आजपासून नवीन आयकर कायदा २०२५ पूर्णतः लागू करण्यात आला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे टॅक्स स्लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या कायद्यात भाषा सोपी करण्यात आली असून, कायदेशीर गुंतागुंत कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
NCP Sharad Pawar : नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी, मला कामातून थोडा ब्रेक घ्यायचा आहे
आता नागरिकांना कर भरण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. ज्या करदात्यांची लेखापरीक्षण प्रक्रिया होत नाही, त्यांच्यासाठी तिसरा आणि चौथा नमुना भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. पहिला आणि दुसरा नमुना भरण्याची अंतिम तारीख मात्र ३१ जुलैच राहणार आहे. लेखापरीक्षणाची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबरच राहील, असं या कायद्यात नमूद करण्यात आलं आहे.
जर भरलेल्या इनकम टॅक्समध्ये रिर्टनमध्ये दुरुस्ती करायची असेल, तर त्यासाठीही आता करदात्यांना अधिकचा वेळ मिळणार आहे. कारण या नव्या कायद्यानुसार सुधारित परतावा भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबरवरून वाढवून ३१ मार्च करण्यात आली आहे. मात्र, ३१ डिसेंबरनंतर सुधारित परतावा भरल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. उशिरा भरल्या जाणाऱ्या परताव्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
टॅक्सच्या दरातही बदल
सरकारने कराच्या दरांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मद्यविक्रीवर आता १ टक्क्यांऐवजी २ टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच भंगार विक्रीवरही कर १ टक्क्यांवरून वाढवून २ टक्के करण्यात आला आहे. कोळसा, लिग्नाइट आणि लोहखनिजांच्या विक्रीवरही २ टक्के कर लागू होणार आहे.
शेअर बाजारातील व्यवहार महागाणार
नव्या कायद्यानुसार, शेअर बाजारातील वायदे आणि ऑप्शन ट्रेडिग करणं महागात पडणार आहे. कारण या व्यवहारांवरील कर आता वाढवण्यात आला आहे. वायद्यांवरील कर ०.०२ टक्क्यांवरून ०.०५ टक्के करण्यात आला आहे, तर ऑप्शन ट्रेडिंगवरील कर ०.१ टक्क्यांवरून वाढवून ०.१५ टक्के करण्यात आला आहे.








