व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Cm relief fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

Cm relief fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

cm-relief-fund-online-process-decision-within-8-hours-maharashtra : अर्जानंतर अवघ्या ३ ते ८ तासांत निर्णय, रुग्णांना तत्काळ दिलासा

Mumbai : राज्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल करण्यात आला असून आता संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात चकरा मारण्याची गरज उरणार नसून अर्जापासून ते निर्णयापर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पार पडणार आहे.

नवीन प्रणालीअंतर्गत रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज राहणार नाही. संबंधित रुग्णालयांनाच रुग्णांची सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावी लागतील. यासाठी प्रत्येक रुग्णालयाला स्वतंत्र लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार असून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे अर्ज अपलोड केल्यानंतर अवघ्या ३ ते ८ कार्यालयीन तासांच्या आत मदतीबाबतचा निर्णय रुग्णालय आणि संबंधित नातेवाईकांना कळवला जाणार आहे. कागदपत्रे उशिरा अपलोड झाल्यास पुढील दिवशी कार्यालयीन वेळेत निर्णय देण्यात येईल. तसेच मंजूर झालेली संपूर्ण मदत एकाच वेळी न देता सुरुवातीला ३० टक्के रक्कम दिली जाईल आणि उर्वरित रक्कम रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर देण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जात असून २०२५ वर्षातच सुमारे ४० हजार ७७६ रुग्णांना तब्बल ३३३.६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर च्या माध्यमातून या निधीत अधिक वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Police reel star : ‘रील स्टार’ पोलीस आणि खंडणीचा खेळ; कायद्याच्या रक्षकांवरच संशय!

दरम्यान, कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि भारत पेट्रोलियम या संस्थांसोबत त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या करारामुळे अशा मुलांना मोफत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी विकसित करण्यात आलेले नवीन ऑनलाइन पोर्टल ७ एप्रिल २०२६ पासून कार्यान्वित करण्यात आले असून जुन्या ऑफलाइन प्रक्रियेला पूर्णविराम देण्यात आला आहे. सर्व अर्ज आता केवळ ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत. रुग्णालयांनी आपला अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे आवश्यक आहे.

Iran us peace talks : इराण-अमेरिका चर्चा २१ तासांनंतर फिस्कटली, करार न झाल्याने तणाव शिगेला

या लोकाभिमुख निर्णयामुळे गरजू रुग्णांना जलद आणि सुलभ पद्धतीने मदत मिळणार असून उपचार प्रक्रियेत होणारा विलंब मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या डिजिटल प्रणालीचा औपचारिक शुभारंभ लवकरच होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!