congress hoping miracle with srujan campaign : अकोल्यातून सृजन अभियानाची सुरुवात, डिजिटल डेटाबेसद्वारे पक्ष बळकट करण्याचा निर्धार
Akola काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक सक्षम, सशक्त व परिणामकारक करण्यासाठी “गाव तिथे काँग्रेस, वार्ड तिथे काँग्रेस” ही व्यापक संघटन मोहीम अकोल्यातून सुरू करण्यात आली. तळागाळातील कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. स्वराज्य भवन येथे आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अकोला जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नियुक्त निरीक्षक रुद्र राजू यांच्या उपस्थितीत “संघटन सृजन अभियान”चा प्रारंभ झाला. २०१४ पासून राज्य आणि देशात काँग्रेसचे मतदार कमी झाले आहेत. या अभियानातून ‘मिरॅकल’ होण्याची आशा काँग्रेस करत आहे.
राजू म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. पारंपरिक चौकटीत बदल करून आता कार्यकर्त्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा डेटा तयार करून त्याच्या कार्याचा आढावा घेता येणार असून यामुळे संघटन अधिक पारदर्शक व गतिमान होईल.
Proposed Delimitation : मतदारसंघाच्या वाढीचा फायदा कुणाला? संभाव्य पुनर्रचनेमुळे बदलणार समीकरण
जिल्हा अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल तसेच विविध आघाड्यांच्या कार्यकारिण्या लोकशाही पद्धतीने निवडण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत निष्ठावान, प्रामाणिक, सक्रिय आणि तडफदार कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. गटबाजीला आळा घालत सर्वांना समान संधी देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








