Sanitation workers stage a sit-in protest outside Malkapur Municipal Council : अडीच महिन्यांचे वेतन थकीत; मलकापूर नगरपालिकेपुढे सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन
Malkapur अडीच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्रस्त झालेल्या कंत्राटी सफाई कामगारांनी नगर परिषद प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून, दोन दिवसांपासून साफसफाईचा बोजवारा उडाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मलकापूर नगर परिषद हद्दीतील साफसफाईचे कंत्राट अमरावती येथील कंत्राटदार दीपक उत्तराधी यांच्याकडे होते. घंटागाडी, ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन, नाली व डस्टबिन सफाई, फॉगींग फवारणी अशा विविध कामांसाठी सुमारे ७२ कंत्राटी कामगार नियुक्त करण्यात आले होते. संबंधित कंत्राट डिसेंबर २०२५ मध्ये संपल्यानंतरही नगर परिषद प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ दिली होती. जानेवारी २०२६ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत कंत्राटदाराने काम सुरू ठेवले; मात्र या कालावधीतील सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची रक्कम नगर परिषदेकडून अदा करण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे.
Vanchit Bahujan Aghadi : गायकवाड-शिंदे प्रकरणात ‘वंचित’ची उडी; चौकशीची मागणी
परिणामी, कंत्राटदारानेही कामगारांना वेतन दिले नसल्याने कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, १५ मार्चनंतर नगर परिषदेकडून अन्य कंत्राटदारामार्फत त्याच कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. तरीही मागील थकीत वेतनाबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कामगारांनी कामबंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
Mahayuti Government : राज्यातील १७ लाख कर्मचारी पुन्हा संपावर; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प?
आंदोलनकर्त्या कामगारांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मलकापूर शहर पोलीस ठाण्यातही निवेदन देण्यात आले. या प्रकरणामुळे नगर परिषद प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील आर्थिक व प्रशासकीय समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असून, याचे राजकीय पडसाद उमटणार आहेत.







