व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Revenue department : महसूल दाखल्यांत मोठा बदल; ‘युनिक फॉरमॅट’मुळे राज्यभर एकसमान सेवा’

Revenue department : महसूल दाखल्यांत मोठा बदल; ‘युनिक फॉरमॅट’मुळे राज्यभर एकसमान सेवा’

Major Change in Revenue Certificates; ‘Uniform Service Across the State with Unique Format : ‘आपले सरकार’वर अर्ज सुलभ; नवीन प्रणालीने पारदर्शकता व वेग वाढणार

Buldhana महसूल विभागाने जीआर अंतर्गत दाखले वितरण प्रक्रियेत आमूलाग्र बदल करत राज्यभर सहा महत्त्वाची प्रमाणपत्रे आता एकाच ‘युनिक फॉरमॅट’मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करून ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे.

महसूल व वन विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांना वेगवेगळ्या नमुन्यांचा गोंधळ सहन करावा लागणार नाही. एकसमान स्वरूपामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार असून, नागरिकांचा वेळ तसेच प्रशासनाचा मनुष्यबळ यांची बचत होणार आहे. यामुळे सेवा वितरणात एकरूपता येऊन राज्यभर एकाच निकषांनुसार दाखले दिले जाणार आहेत.

Ashok uikey : राळेगाव प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई होणार

शासनाच्या नव्या निर्णयानुसार शपथपत्र, वय-राष्ट्रीयत्व-अधिवास प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र (१ व ३ वर्षांसाठी), भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र आणि अल्प भूधारक प्रमाणपत्र या सहा महत्त्वाच्या सेवांच्या अर्ज व प्रमाणपत्रांच्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुसंगत आणि सुलभ होणार आहे.

नवीन प्रणालीत अर्जातील अनावश्यक बाबी कमी करून आवश्यक घटकांवर भर देण्यात आला आहे. परिणामी अर्जदारांना कमी कागदपत्रे सादर करावी लागणार असून, प्रक्रिया अधिक वापरकर्ता-अनुकूल झाली आहे. सुधारित अर्ज व प्रतिज्ञापत्रांचे नमुने ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे.

Devendra fadnavis : महिला आरक्षणाला विरोध करणारे ‘सिरीयल लायर्स’, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

ओळख पडताळणी प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, आता आधार क्रमांकावर आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट अर्जांना आळा बसण्यास मदत होणार असून, संपूर्ण प्रक्रियेची विश्वासार्हता वाढणार आहे. तसेच, प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२९, २३६ आणि २३७ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

या सुधारणेमुळे शासकीय सेवांचा दर्जा उंचावण्याबरोबरच भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन मलकापूरचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!