व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Devendra fadnavis : महिला आरक्षणाला विरोध करणारे ‘सिरीयल लायर्स’, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra fadnavis : महिला आरक्षणाला विरोध करणारे ‘सिरीयल लायर्स’, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

devendra-fadnavis-attack-on-opposition-women-reservation-bill-serial-liars-challenge : ‘झूठ की उमर बड़ी नहीं होती, सच कभी समाप्त नहीं होता,’ काँग्रेसला टोमणा

Mumbai: महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत त्यांना थेट “सीरियल लायर्स” असे संबोधले आहे. लोकसभेत विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून हा वाद आता रस्त्यावरही उतरल्याचे चित्र आहे.

युवा शक्ती जागर यात्रेच्या निमित्ताने बोलताना फडणवीस यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, महिला आरक्षणाबाबत विरोधकांची भूमिका दुटप्पी असून त्यांनी आधी समर्थन दर्शवले, मात्र आता राजकीय परिस्थिती बदलताच खरे स्वरूप समोर आले आहे. “झूठ की उमर बड़ी नहीं होती, सच कभी समाप्त नहीं होता,” असा इशारा देत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले.

Shivsena Eknath Shinde : काय सांगता! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ‘ऑफर’?

फडणवीस यांनी युवा शक्तीच्या भूमिकेवरही भर देत राज्यातील ३५ वर्षांखालील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले. या युवकांना एकत्रित करून सकारात्मक दिशेने नेल्यास राज्यात मोठे परिवर्तन घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या यात्रेचे त्यांनी कौतुक करत ही मोहीम राज्यभर पोहोचवण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावरही भाष्य करत काही शक्ती युवकांमध्ये अराजकतेची बीजे पेरत असल्याचा आरोप केला. महाविद्यालयीन स्तरावर संविधानविरोधी विचार रुजवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी याला प्रत्युत्तर देण्यासाठी जागर यात्रेचे महत्त्व अधोरेखित केले.

Nagpur Municipal corporation : एमआयएमचा अंतर्गत ‘सौदा’ चव्हाट्यावर; गटनेत्यावर दीड कोटींचा आरोप, ५ कोटींच्या मानहानीचा दावा!

महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, विरोधकांनी या विधेयकाला विरोध करून नारी शक्तीचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकाबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती आणि विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणा स्वीकारण्याची तयारीही दर्शवली होती, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, विरोधकांशी खुल्या चर्चेला तयार असल्याचे संकेत देत फडणवीस यांनी “तुमच्या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू आहे आणि महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही,” असे ठामपणे सांगितले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!