व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Narishakti vandan bill : ‘नारीशक्ती वंदन’च्या विरोधावर शिंदेसेनेचा हल्लाबोल; खामगावात निषेध आंदोलन

Narishakti vandan bill : ‘नारीशक्ती वंदन’च्या विरोधावर शिंदेसेनेचा हल्लाबोल; खामगावात निषेध आंदोलन

Shivsena (Eknath Shinde) slams opposition to ‘Nari Shakti Vandan; protest held in Khamgaon : इंडिया आघाडीवर महिलांविरोधी भूमिकेचा आरोप; एसडीओ कार्यालयासमोर घोषणाबाजी

Khamgao ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ला विरोध केल्याचा आरोप करत शिंदेसेनेच्या वतीने खामगाव येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे इंडिया आघाडीच्या भूमिकेवर तीव्र टीका करत, महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रश्नावर विरोधकांनी नकारात्मक भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संताप व्यक्त करण्यात आला.

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे हे विधेयक महिलांच्या राजकीय सहभागासाठी ऐतिहासिक ठरले असते. मात्र, इंडिया आघाडीच्या विरोधामुळे १६ एप्रिल २०२६ हा दिवस ‘काळा दिवस’ ठरल्याची टीका करण्यात आली. “महिलांच्या हक्कांबाबत दुहेरी भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा खरा चेहरा उघड झाला आहे,” असा आरोपही यावेळी करण्यात आला.

Cabinet decision : कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण, आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना दिलासा; आयटी पार्कसाठी जमीन

आंदोलनादरम्यान एसडीओ कार्यालयासमोर शिंदेसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदविला. महिलांना न्याय मिळावा आणि संबंधित विधेयकाला मंजुरी मिळावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

Khadse vs wagh : रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावरून पुन्हा शब्दयुद्ध!

या आंदोलनातून सत्ताधारी आणि विरोधकांमधील महिलांच्या प्रश्नावरचे राजकीय ध्रुवीकरण स्पष्टपणे दिसून आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांचा मुद्दा केंद्रस्थानी येत असून, या विषयावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. या निषेध आंदोलनात संजय अवताडे, अमोल अंधारे, राजेंद्र बघे, सुरेश वावगे, चेतन ठोंबरे, कावेरी वाघमारे, जयश्री देशमुख, अमोल फेरंग, युवासेना बहादूर वाघे, श्रुती पतंगे, राहुल कळमकार, पिंटू धोरण, विकी सारवाण यांच्यासह शिंदेसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!